'Bigg Boss 17'च्या घरात आला 'बाबू भैय्या', प्रसिद्ध बाईक रायडरला ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 22:24 IST2023-10-15T22:24:07+5:302023-10-15T22:24:39+5:30
'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. या शोमध्ये पहिल्यांदाच बाइक रायडरने एन्ट्री घेतली आहे.

'Bigg Boss 17'च्या घरात आला 'बाबू भैय्या', प्रसिद्ध बाईक रायडरला ओळखलं का?
छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितक्याच लोकप्रिय असलेल्या 'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'ची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच 'बिग बॉस १७'चा ग्रँड प्रिमियर पार पडला. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे. आता बिग बॉसच्या घरात बाईक रायडर अनुराग डोभालने पाऊल ठेवलं आहे.
अनुराग डोभाल हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. तो बाईक रायडर म्हणूनही ओळखला जातो. अनुराग डेहरादूनचा आहे. बाबू भैय्या या नावानेही तो ओळखला जातो. पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात एका बाईक रायडरची एन्ट्री झाली आहे. आता अनुराग बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचं किती मनोरंजन करतो, हे पाहावं लागेल.
दरम्यान, यंदाच्या पर्वाची सिंगल विरुद्ध कपल अशी थीम आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान या शोचं सूत्रसंचालन करत आहे. सोमवार ते शुक्रवार कलर्स टीव्हीवर रात्री १० वाजता आणि शनिवार-रविवार रात्री ९ वाजता हा शो पाहता येणार आहे. जिओ सिनेमावर 'बिग बॉस १७' प्रेक्षकांना फ्रीमध्ये पाहता येईल.