"तुझ्यामुळे आज तो रडतोय" अंकिताला सासूने ऑनस्क्रीनच झापलं, विकीला म्हणाली, 'तू सूट दिली...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 01:48 PM2023-11-28T13:48:19+5:302023-11-28T13:49:03+5:30

विकीच्या आईचं बोलणं मध्येच थांबवत अंकिता म्हणते, 'सूट दिली म्हणजे मम्मा?'

Bigg Boss 17 new promo viral weekend ka vaar Ankita Lokhande and Vicky Jain s mother talks with them | "तुझ्यामुळे आज तो रडतोय" अंकिताला सासूने ऑनस्क्रीनच झापलं, विकीला म्हणाली, 'तू सूट दिली...'

"तुझ्यामुळे आज तो रडतोय" अंकिताला सासूने ऑनस्क्रीनच झापलं, विकीला म्हणाली, 'तू सूट दिली...'

'बिग बॉस' 17 (Bigg Boss 17) मध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) ही जोडी मुख्य आकर्षण आहे. नुकतंच विकेंड का वार मध्ये अंकिता आणि विकी दोघांच्या आई बिग बॉसमध्ये आल्या आहेत. कलर्सने शोचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये विकी जैन ढसाढसा रडत असून त्याची आई अंकिताला नॅशनल टेलिव्हिजनवरच झापताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अंकिता आणि विकी दोघंही आपापल्या आईला बघून खूश होतात. दरम्यान विकीला अक्षरश: रडूच कोसळतं. लेकाला रडताना पाहून त्याची आई म्हणते,'तुम्ही दोघं इथे किती भांडत आहात. अशी काय तू सूट दिली आहेस ना अंकिताला...' विकीच्या आईचं बोलणं मध्येच थांबवत अंकिता म्हणते,'सूट दिली म्हणजे मम्मा?'



रडू नकोस विकी, तुला आम्ही कधी रडताना नाही पाहिलं. विकी हे तुझं घर नाहीए तू खेळ खेळायला आलोय. अंकिता तू नाही सांभाळत आहेस त्याला. आम्ही बघतोय ना किती रडतोय तो. हात जोडून विनंती आहे बेटा, आम्ही तुझ्यामुळे विकीला तिकडे पाठवलं पण इथे तर तुझाच खेळ झालाय.'

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना मात्र अंकिताबद्दल वाईट वाटलं आहे. 'शेवटी सासू ती सासूच असते','ही सासू तर रेड फ्लॅग आहे' अशा कमेंट्स युझर्सने केल्या आहेत. 

Web Title: Bigg Boss 17 new promo viral weekend ka vaar Ankita Lokhande and Vicky Jain s mother talks with them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.