प्रियांकाच्या 'त्या' सल्ल्यामुळे बदललं मन्नाराचं नशीब; bigg boss 17 मध्ये निर्माण झाली ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 17:55 IST2024-01-28T17:55:14+5:302024-01-28T17:55:55+5:30
Mannara chopra: मन्नारा प्रियांकाची आत्येबहीण आहे हे फार कमी जणांना ठावूक आहे

प्रियांकाच्या 'त्या' सल्ल्यामुळे बदललं मन्नाराचं नशीब; bigg boss 17 मध्ये निर्माण झाली ओळख
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉसचं 17 (bigg boss 17) वं पर्व आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. अवघ्या काही तासांमध्ये यंदाच्या पर्वाचा विजेता घोषित होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या ग्रँड फिनाले सोहळ्याकडे लागलं आहे. या पर्वामध्ये अनेक स्पर्धक त्यांच्या टास्क खेळण्याती पद्धत, घरातील वादविवाद, पर्सनल लाइफ यांसारख्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिले. यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या (priyanka chopra) बहिणीने मन्नाराने (mannara chopra). आपल्या स्वभावामुळे मन्नाराने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यामुळेच सोशल मीडियावर सध्या तिच्या नावाची चर्चा रंगली आहे.
मन्नारा ही अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची सख्खी आत्येबहीण आहे हे फार कमी लोकांना ठावूक आहे. परंतु, प्रियांका आणि तिचं नातं खूप घट्ट आहे. बिग बॉसमध्ये मन्नाराला प्रियांका, मधु चोप्रा यांनीही चांगलाच सपोर्ट केला आहे. त्यामुळे सध्या मन्नारा चर्चेत आहे. विशेष म्हणजे प्रियांकाचा एक सल्ला तिला प्रचंड उपयोगी पडला.
कलाविश्वात येण्यापूर्वी मन्नाराने तिचं नाव बदललं आहे. विशेष म्हणजे प्रियांकाच्या सल्ल्यामुळेच तिने हा निर्णय घेतला हे फार कमी जणांना ठावूक आहे. मन्नाराचं खरं नाव बार्बी हांडा असं आहे. परंतु, हे नाव भारतीय असल्यासारखं वाटत नसल्यामुळे प्रियांकाने तिला बदलण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं जातं. बहिणीच्या सांगण्यावरुन मन्नाराने केवळ नावच नाही तर तिचं आडनाव सुद्धा बदललं.
दरम्यान, मन्नाराने झिद या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. परंतु, तिचा सिनेमा फारसा यशस्वी ठरला नाही. परंतु, बिग बॉस 17 मुळे तिला खरी ओळख मिळाली. मन्नाराने यापूर्वी लहान-मोठ्या जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तसंच दाक्षिणात्य कलाविश्वातही तिने तिची छाप उमटवली आहे.