Bigg Boss 16 Winner: एमसी स्टॅन ट्रॉफी जिंकताच सोशल मीडियावर सुरु झालं युद्ध, लोक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:05 PM2023-02-13T13:05:35+5:302023-02-13T13:22:14+5:30

स्टॅनने बाजी मारली. पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या निर्मात्यांवर निशाणा साधला आहे.

Bigg boss 16 winner mc stan trolled to lift trophy of salman khan show people said he is undeserving | Bigg Boss 16 Winner: एमसी स्टॅन ट्रॉफी जिंकताच सोशल मीडियावर सुरु झालं युद्ध, लोक म्हणाले...

Bigg Boss 16 Winner: एमसी स्टॅन ट्रॉफी जिंकताच सोशल मीडियावर सुरु झालं युद्ध, लोक म्हणाले...

googlenewsNext

Bigg Boss 16 Winner MC Stan:काल रविवारी बिग बॉस १६ चा ग्रॅण्ड फिनाले पार पडला. पुण्याचा एमसी स्टॅन  (MC Stan) हा यंदाच्या पर्वाचा विजेता झाला. ग्रॅण्ड फिनालेत प्रियंका चहर चौधरी, एमसी स्टॅन व शिव ठाकरे हे टॉप ३ मध्ये होते. अखेरच्या क्षणी प्रियंका शोमधून बाहेर झाली. यानंतर शिव व एमसी यांच्यात तगडा मुकाबला रंगला. दोघांपैकी विजेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, ही उत्सुकता ताणली गेली असतानाच स्टॅनने बाजी मारली. यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

जर आपण बिग बॉसच्या संपूर्ण प्रवासाबद्दल बोललो तर, प्रियांका आणि शिवच्या तुलनेत एमसी स्टॅनचा सहभाग खूपच कमी आहे. तथापि, स्टॅनचा नेहमीच रिअल असा उल्लेख केला जात असे. भांडणापासून ते मैत्रीपर्यंत सगळ्यांनाच स्टेनच्या खरेपणाचे कौतुक वाटत होतं. शोमध्ये सेलिब्रिटी येऊन त्याची स्तुती करत असत, तर बाहेर त्याचे चाहते त्याला विजेते म्हणून पाहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. शेवटी, स्टॅनने प्रचंड मतांनी ट्रॉफी जिंकली.


ट्रोल होतोय एमसी स्टेन
स्टॅन विजेता होताच त्याचे चाहते सोशल मीडियावर सेलिब्रेशन करत आहेत. स्टॅनला ही ट्रॉफी मिळाल्याने त्याचे चाहते खूप खूश आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक त्याला ट्रॉफीवरुन ट्रोल करत त्याला टोमणे मारत आहेत. एका यूजरने लिहिले, “एमसी स्टेनला विजेता बनताना पाहून मी एक गोष्ट शिकलो. कोणतेही काम करू नका, महिलांचा आदर करू नका, आळशी राहा, तुम्ही विजेता होऊ शकता! हा विनोद आहे का? अर्चना-प्रियांकाने सर्व टास्क एकट्याने केल्या आणि त्या जिंकल्या नाहीत. निर्मात्यांची लाज वाटते. त्याचप्रमाणे प्रत्येकजण निर्मात्यांना टार्गेट करत असून स्टेन विजेता होण्यावर आक्षेप घेत आहेत.

 

 

 

Web Title: Bigg boss 16 winner mc stan trolled to lift trophy of salman khan show people said he is undeserving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.