Bigg Boss 16 Promo: मुझसे दूर रहो...सुम्बुलवर बरसला शालीन भनोट, ‘इमली’ला आला पॅनिक अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:48 PM2022-11-24T14:48:37+5:302022-11-24T14:49:01+5:30

Bigg Boss 16 Promo: आजच्या एपिसोडमध्ये सुम्बुलचा खास मित्र फहमान खानची एन्ट्री होणार आहे. अर्थात त्याआधी एक मोठा ड्रामाही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

bigg boss 16 shalin bhanot tina dutta shouts at sumbul touqeer khan fahmaan khan entry | Bigg Boss 16 Promo: मुझसे दूर रहो...सुम्बुलवर बरसला शालीन भनोट, ‘इमली’ला आला पॅनिक अटॅक

Bigg Boss 16 Promo: मुझसे दूर रहो...सुम्बुलवर बरसला शालीन भनोट, ‘इमली’ला आला पॅनिक अटॅक

googlenewsNext

बिग बॉस 16’मध्ये (Bigg Boss 16) सध्या ‘इमली’ फेम सुम्बुक तौकीर खानमुळे (Sumbul Touqeer ) ‘हंगामा’ सुरू आहे. सुम्बुलच्या नावावर शोला टीआरपी मिळतोय आणि याचमुळे तिचा गेम अप करण्यासाठी वारंवार प्रयत्न होताना दिसतोय. आगामी एपिसोडमध्ये सुम्बुलचा खास मित्र फहमान खानची एन्ट्री होणार आहे. अर्थात त्याआधी एक मोठा ड्रामाही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

याचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोत शालीन भनोटचा संतापाने लाल झालेला पाहायला मिळतोय. शालीन सुम्बुलवर ओरडत तिला स्वत:पासून आणि टीनापासून दूर राहण्याचा सल्ला देतो. क्यों बात करती हो हमसे. दूर रहो मतलब दूर रहो. हमारी क्या गलती है, वो खुद आती है बात करने..., असं तो म्हणतो आणि रागारागात टेबलाला लाथ मारतो. मै कब तुमसे बात करने के लिए आई,असं सुम्बुल म्हणते आणि तिकडे टीनाही पारा चढतो. लोग वहीं बोल रहे हैं जो बाहर दिख रहा है..., असं म्हणत ती सुद्धा सुम्बुलवर बरसते.

सुम्बुल यानंतर काय करणार? तर तिची रडारड सुरू होते. इतकी की, तिला पॅनिक अटॅक येतो. तिची तब्येत बिघडलेली पाहून निम्रत सुम्बुलला मेडिकल रूममध्ये बोललावं, अशी विनंती बिग बॉसकडे करताना दिसते.
आता खरी भानगड काय आहे, हे तर एपिसोड पाहिल्यानंतरच कळेल.

सुम्बुलसाठी फहमान येतोय...

या सगळ्या ड्राम्यानंतर आता बिग बॉसच्या घरात फहमान खानची एन्ट्री होणार आहे. फहमान हा सुम्बुलचा मित्र आहे. त्याला पाहून सुम्बुल आनंदाने उड्या मारू लागते. रिपोर्टनुसार, फहमान 1-2 दिवसांसाठीच बिग बॉसच्या घरात राहणार आहे. सुम्बुलला प्रेरणा देणं, तिला तिच्या गेमसाठी मदत करणं हा त्याचा उद्देश आहे.

Web Title: bigg boss 16 shalin bhanot tina dutta shouts at sumbul touqeer khan fahmaan khan entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.