Bigg Boss 16: MC Stanला आला ‘बिग बॉस’चा कंटाळा! बाहेर पडण्यासाठी 2 कोटी मोजायला तयार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 04:56 PM2022-12-06T16:56:51+5:302022-12-06T16:57:20+5:30

Bigg Boss 16: एमसी स्टॅनची मोठी फॅन फॉलोइंग असल्याने तो बिग बॉसच्या घरात टिकून आहे. पण आता मात्र स्टॅनला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडायचं आहे. अगदी यासाठी कोट्यवधी रूपये मोजायलाही तो तयार आहे.

Bigg Boss 16: MC Stan will leave show, ready to give 2 crores for this | Bigg Boss 16: MC Stanला आला ‘बिग बॉस’चा कंटाळा! बाहेर पडण्यासाठी 2 कोटी मोजायला तयार!!

Bigg Boss 16: MC Stanला आला ‘बिग बॉस’चा कंटाळा! बाहेर पडण्यासाठी 2 कोटी मोजायला तयार!!

googlenewsNext

तरूणाईला एमसी स्टॅन हे नाव चांगलंच ठाऊक आहे.  एमसी स्टॅन (MC Stan) हा प्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे. सध्या तो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) गाजवतोय. एमसी स्टॅनची मोठी फॅन फॉलोइंग असल्याने तो बिग बॉसच्या घरात टिकून आहे. पण आता मात्र स्टॅनला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडायचं आहे. अगदी यासाठी कोट्यवधी रूपये मोजायलाही तो तयार आहे. होय, स्टॅन असं काही बोलून गेला की त्याचे चाहते अस्वस्थ झालेत.

तर झालं असं की, निम्रीत कौर, शिव ठाकरे व अब्दु रोझिक हे गप्पा मारत असताना अचानक एमसी स्टॅननं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. मी 2 कोटी देऊन या शोमधून बाहेर पडेल. कारण आता इथे माझं मनं रमत नाहीये, असं स्टॅन म्हणाला. यावर निम्रीतने त्याला समजवण्याचा प्र्रयत्न केला. याआधीही स्टॅनने अनेकदा बिग बॉस शो सोडण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आता खरंच एमसी स्टॅन शो सोडणार की नाही? हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.  

एमसी स्टॅनचं खरं नाव अल्ताफ शेख आहे.  लोकं त्याला तुपाक या नावानेही ओळखतात. एमसी स्टॅनने बाराव्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. तो वयाच्या बाराव्या वषार्पासून कव्वाली गाायचा. त्याने भारतातील आणि जगभरातील अनेक मोठ्या गायकांसोबत स्टेजवर परफॉर्म केले आहे. सहावीला असताना त्याने रॅप लिहायला सुरुवात केली. आठवीला असताना त्याने पहिलं रॅप गाणं गायला. 

2018 मध्ये एमसी स्टॅनने  त्यांचं पहिलं गाणं ‘वाता’ गायलं आणि ते तुफान हिट झालं. त्याच्या या व्हिडिओला यूट्यूबवर 1 मिलियन्सहून अधिक व्ह्यूज मिळाले. स्टॅनच्या रॅप गाण्याला त्याच्या कुटुंबीयांनी कधीच पाठिंबा दिला नाही. ते नेहमी त्याला टोमणे मारायचे.   पण त्याने   हार मानली नाही. आज काय तर त्याच्या कुटुंबालाही त्याचा अभिमान वाटतो.

Web Title: Bigg Boss 16: MC Stan will leave show, ready to give 2 crores for this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.