छोटा ड्रेस घालून घरातून बाहेर पडली 'बिग बॉस 16’ फेम Nimrit Kaur Ahluwalia, नेटिझन्स केलं तिला ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 13:26 IST2023-03-02T13:17:05+5:302023-03-02T13:26:58+5:30
छोट्या ड्रेसमुळे निमृत कौर बॉडी शेमिंगचीचा देखील शिकार ठरली आहे.

छोटा ड्रेस घालून घरातून बाहेर पडली 'बिग बॉस 16’ फेम Nimrit Kaur Ahluwalia, नेटिझन्स केलं तिला ट्रोल
Nimrit Kaur Ahluwalia Trolled: छोटी सरदारनी (Choti Sarrdaarni) मालिकेतून घराघरात पोहोचलेली निमृत कौर अहलूवालिया 'बिग बॉस १६'मुळे चर्चेत आली. बिग बॉसनंतर निमृत प्रसिद्धी झोतात असतं. याशोनंतर तिचं फॅन फॉलोईंगही चांगलंच वाढलं आहे. आता मात्र अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.
छोट्या ड्रेसमध्ये स्पॉट झाली निमृत
कालरात्री म्हणजेच १ मार्चला २०२३ला निमृत कौर मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान अभिनेत्रीने प्रिंडेट शॉर्ट ड्रेस घातला होता यावर मोठे इअररिंग्स आणि मॅसी पोनीटेलने आपला लूक पूर्ण केला होता. कमीत कमी मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिक तिच्यावर चांगली दिसत होती. निमृत या अटायरमध्ये सुंदर दिसत होती मात्र काही लोकांनी तिला वाईट पद्धतीने ट्रोल केलं आहे.
लोकांनी निमृतला केलं ट्रोल
काहींनी तिचा ड्रेसिंग सेन्स चांगला नसल्याचं म्हटले, तर काहींनी तिचा ड्रेस किशोरवयीन मुलीप्रमाणे असल्याचे सांगितले. काहींनी लहान मुलांसारखा शॉर्ट ड्रेस परिधान केल्याबद्दल निमृतला टार्गेट केलंय. या ड्रेसमुळे निमृत कौर बॉडी शेमिंगची शिकार ठरली आहे. एकंदरीत अनेकांना तिचा ड्रेसिंग सेन्स समजला नाही म्हणून ते तिला ट्रोल करत होते. मात्र, निमृतच्या चाहत्यांनीही त्यांच्या आवडत्या स्टारच्या सौंदर्याचे कौतुक केले आणि चाहत्यांना तिचा लूक खूप आवडला.
निमृत लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'बिग बॉस 16' मध्ये, निर्माता एकता कपूरने तिला तिच्या 'लव्ह सेक्स और धोखा' (लव्ह सेक्स और धोखा 2) चित्रपटाच्या दुसऱ्या सीझनसाठी कास्ट केले. याशिवाय तिला 'लॉक अप 2' ची ऑफर देखील आली होती, परंतु अभिनेत्रीने त्याला नकार दिल्याच्या बातम्या आहेत, कारण तिला सध्या कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये जायचे नाही.