Bigg Boss 16: सलमानच्या 'बिग बॉस'मध्ये यंदा दिसणार 'हा' मराठमोळा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 05:14 PM2022-09-28T17:14:06+5:302022-09-28T17:19:56+5:30

१ नोव्हेंबरला बिग बॉसचं ग्रँड प्रिमियर

Bigg Boss 16 by Salman Khan Marathi Actor Shiv Thakare Celebrity confirmed for this season see details | Bigg Boss 16: सलमानच्या 'बिग बॉस'मध्ये यंदा दिसणार 'हा' मराठमोळा चेहरा

Bigg Boss 16: सलमानच्या 'बिग बॉस'मध्ये यंदा दिसणार 'हा' मराठमोळा चेहरा

googlenewsNext

Salman Khan Bigg Boss 16, Marathi Celebrity: 'बिग बॉस'चा १६वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. 'बिग बॉस 16' बद्दल विविध चर्चा रंगल्या आहेत. १ तारखेला या शो चे प्रिमियर आहे. याच दरम्यान आता शो चे निर्माते यांनी नवीन प्रोमो शेअर करताना आणखी एका स्पर्धकाविषयी खुलासा केला आहे. स्पर्धकांचे चेहरे समोर आलेले नाहीत. मात्र अनेकांकडून एक-एक रेकॉर्ड घेऊन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी, टीव्ही शोची सर्वात लाडकी सून असलेली मेहर म्हणजेच निम्रत अहलुवालिया यंदाचा एक स्पर्धक असू शकते, असा अंदाज लावला जात आहे. यासोबतच मराठी मातीतला एक चेहरादेखील या शो साठी सज्ज झाला असल्याची माहिती आहे.

मराठी बिग बॉसच्या पर्वात जितका ड्रामा असतो त्यापेक्षा सलमानच्या बिग बॉसमधील ड्रामा अन् राडा थोडा अतिच असतो असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. पण यंदाच्या सीझनमध्ये मराठी बिग बॉस खेळलेला आणि विजेता ठरलेला शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या १६व्या सीझनमध्ये दिसणार आहे असं बोललं जातंय. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात तो विजेत ठरला होता. मूळचा अमरावतीचा असलेला शिव ठाकरे MTV Roadies या शो मुळे लोकप्रिय झाला. त्या शो मध्ये तो रणविजयच्या गटात होता. त्यानंतर महेश मांजरेकरांच्या बिग बॉस मराठीमध्ये तो विजेता ठरला. त्यावेळी त्याची आणि वीणा जगताप हिची चांगलीच लव्ह केमिस्ट्री जुळली होती. पण नंतर त्यांचं ब्रेक झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे हिंदी बिग बॉसमध्ये शिव काय धमाल करतो याकडे साऱ्या मराठी प्रेक्षकांचं लक्ष असेल. मात्र शिवच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

--

दरम्यान, अलीकडेच शो चा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये एका स्पर्धकाबाबत जवळपास उघडपणे बोलण्यात आले. 'बिग बॉस' ने आगामी 16 व्या सीझनचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला. तो स्पर्धक म्हणजे निम्रत अहलुवालिया. शेवटच्या प्रोमोमध्ये निम्रतचा चेहरा पूर्णपणे दाखवण्यात आला नव्हता. पण निम्रतची थोडीशी झलक दिसली. तिचा आवाज ऐकून लोकांना ती निम्रत अहलुवालिया असल्याचा अंदाज लावणे अवघड गेले नाही. निम्रतचा आवाज ऐकून चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रोमोला प्रतिसाद देत लिहायला सुरुवात केली की ही दुसरी कोणी नसून निम्रत कौर आहे.

Web Title: Bigg Boss 16 by Salman Khan Marathi Actor Shiv Thakare Celebrity confirmed for this season see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.