Bigg Boss 15 Promo: बिचुकलेने जांभई दिली अन्..., कधी नव्हे इतका भडकला सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 12:33 PM2021-12-31T12:33:35+5:302021-12-31T12:34:14+5:30

Bigg Boss 15 Weekend Ka Vaar: या सीझनमध्ये पहिल्यांदा दिसला सलमानचा अँग्रीमॅन अवतार, बिचुकले व शमितावर असा बरसला की सगळ्यांचीच बोलती झाली बंद...

Bigg Boss 15 : weekend ka vaar promo salman khan angry with abhijeet bichukale Shamita shetty | Bigg Boss 15 Promo: बिचुकलेने जांभई दिली अन्..., कधी नव्हे इतका भडकला सलमान खान

Bigg Boss 15 Promo: बिचुकलेने जांभई दिली अन्..., कधी नव्हे इतका भडकला सलमान खान

googlenewsNext

बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15 ) घरात या आठवड्यात हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. होय, घरातील स्पर्धकांनी चक्क ‘टिकट टू फिनाले’ टास्क रद्द केला. अगदी फिनालेमध्ये जाण्याची संधी असताना स्पर्धकांनी ती गमावली. मग काय सलमान (Salman Khan) चांगलाच भडकला आणि शुक्रवारीच स्पर्धकांचा क्लास घ्यायला पोहोचला.
होय, आज शुक्रवारी सलमान सदस्यांची क्लास घेताना दिसणार आहे. याचा एक प्रोमो काही तासांपूर्वीच समोर आला. यात सलमान शमिता शेट्टी  (Shamita Shetty) आणि अभिजीत बिचुकलेवर (Abhijeet Bichukale) प्रचंड भडकलेला दिसतोय.

  बिचुकलेने जांभई दिली अन्...

 टास्क रद्द करण्याच्या कारणावरून सलमान आधीच भडकला होता. टास्क रद्द करण्यात तुम्ही सर्वांनी पीएचडी केलीये, असं तो रागारागात म्हणतो. त्याला असं भडकलेलं पाहून सगळे स्पर्धक गंभीर चेहऱ्यानं माना खाली घालून ऐकत असतात आणि अशात अभिजीत बिचुकले जांभई देतो. मग काय, सलमानचा पारा आणखीच चढतो. बिचुकलेला जांभई देताना पाहून, भाईजान जाम चिडतो. बिचुकले जाओ बिस्तर पर जाके सो जाओ. ये सब मेरे साथ नहीं चलेगा. सो जाओ, असं तो बिचुकलेला सुनावतो. यावर बिचुकले माफी मागताना दिसतो. पण सलमान त्याच्यावर इतक्या जोरात ओरडतो की, तो शांत बसतो.

सलमानचा सुटला ताबा...
शुक्रवारच्या एपिसोडमध्ये सलमानचा अँग्रीमॅन अवतार पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये सलमान शमितावरही बरसला. राखीसोबत तुझं वागणं चुकीचं आहे, असं सलमान शमितावर म्हणतो. यावर शमिता,‘मैं सेम एटिट्यूड के साथ किसी और पर नहीं चढ़ने वाली हूं. आप मुझे कह रहे हैं कि मेरा एटिट्यूड इसके साथ गलत है. मुझे नहीं पता...,’ असं शमिता म्हणते आणि सलमान आऊट ऑफ कंट्रोल होतो. तो इतक्या जोरात चिडतो की, शमिता रडत रडत तिथून निघून जाते.

 

Web Title: Bigg Boss 15 : weekend ka vaar promo salman khan angry with abhijeet bichukale Shamita shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.