Bigg Boss 15: नॅशनल टीव्हीवर तू मला..., उमर रियाजचं गीता कपूरला सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 01:30 PM2022-01-11T13:30:59+5:302022-01-11T13:31:40+5:30

Bigg Boss 15: उमर रियाज गीता कपूरवर का भडकला? काय आहे भानगड?

Bigg Boss 15: Umar Riaz reacts to Geeta Kapur's comment on his profession | Bigg Boss 15: नॅशनल टीव्हीवर तू मला..., उमर रियाजचं गीता कपूरला सणसणीत उत्तर

Bigg Boss 15: नॅशनल टीव्हीवर तू मला..., उमर रियाजचं गीता कपूरला सणसणीत उत्तर

googlenewsNext

Bigg Boss 15: ‘बिग बॉस 15’चा फिनाले जसजसा जवळ येतोय, तसतशी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात बिग बॉसने चाहत्यांना मोठा धक्का दिला. शोच्या विजेतेपदाचा दावेदार समजला जाणारा उमर रियाज (Umar Riaz) फिनालेला काही दिवस उरले असताना आऊट झाला. त्याच्या एलिमेशनने अनेकांना धक्का बसला. पण तूर्तास बातमी ती नाही. घरातून बाहेर पडल्यावर उमरने कोरिओग्राफर गीता कपूरला (गीता मां) ( Geeta Kapur) सणसणीत उत्तर दिलं आहे. होय, गेल्या वीकेंडला गीता कपूर  स्पेशल गेस्ट बनून ‘बिग बॉस 15’च्या घरात आली होती. यावेळी तिने उमर रियाजचा जोरदार क्लास घेतला होता. उमरने आता त्यालाच उत्तर दिलं आहे.

‘गीता कपूर, तू एका रिअ‍ॅलिटी शोमधील माझं वागणं आणि माझ्या डॉक्टरी पेशाचा संबंध जोडून मला जज केलंस. मी घरात जे काही वागलो, ते अ‍ॅक्शनला दिलेली रिअ‍ॅक्शन होती आणि ते तू समजू शकली नाहीस. माझ्या बद्दल एक कहाणी रचण्यासाठी नॅशनल टीव्हीवर मला कमी लेखणं, हे दुर्दैवी होतं,’असं ट्वीट  उमरने केलं.

‘देशभरात कोरोनाने हाहाकार माजला असताना डॉक्टर या नात्याने मी  दिवसरात्र देश व देशाच्या लोकांची सेवा केली होती. कारण मला तेच संस्कार मिळाले आहे. मी माझ्याबद्दल विचार करत नाही,’असं तो अन्य एका ट्वीट मध्ये म्हणाला.

गीता कपूर काय म्हणाली होती
गीता कपूर ‘बिग बॉस 15’च्या घरात स्पेशल गेस्ट म्हणून आली होती. यावेळी तिने उमरच्या अ‍ॅग्रेसिव्ह स्वभावावर टीका केली होती. ‘तू पेशाने एक डॉक्टर आहेस आणि मी कधीही अशा माणसाकडून उपचार करून घेणार नाही, ज्यात इतकं अ‍ॅग्रेशन आहे. तुझा स्वत:वर ताबा नसतो. माझ्या मनात तर भीती निर्माण झालीये. तू काय करतोय, तेच मला कळत नाही. तू अशा प्रोफेशनमध्ये आहेस, जिथे तुला तुझं डोकं शांत ठेवण्याची गरज आहे,’असं गीता कपूर म्हणाली होती.  

Web Title: Bigg Boss 15: Umar Riaz reacts to Geeta Kapur's comment on his profession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.