Bigg Boss 14 : पतीच्या आठवणीत ढसाढसा रडली राखी सावंत, यानंतर असा ड्रामा की ‘बिग बॉस’ही झालेत हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 05:28 PM2021-01-05T17:28:04+5:302021-01-05T17:30:43+5:30

राखीला उगाच म्हणत नाहीत ड्रामा क्वीन

bigg boss 14 rakhi sawant cries and says now want my husband to come in front of all | Bigg Boss 14 : पतीच्या आठवणीत ढसाढसा रडली राखी सावंत, यानंतर असा ड्रामा की ‘बिग बॉस’ही झालेत हैराण

Bigg Boss 14 : पतीच्या आठवणीत ढसाढसा रडली राखी सावंत, यानंतर असा ड्रामा की ‘बिग बॉस’ही झालेत हैराण

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या एक-दोन दिवसांत राखीचा पती रितेश बिग बॉसच्या घरात येईल, असे मानले जातेय. राखीच्या पतीला अद्याप कोणीही पाहिले नाही. मात्र हाच राखीचा पती आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे.

 राखी सावंत सध्या ‘बिग बॉस 14’च्या घरात आहेत आणि घरातील तिची ड्रामेबाजी पाहून सगळेच हैराण आहेत. आता तर खुद्द बिग बॉसही तिच्या ड्राम्याने हैराण झालेत. होय, राखी पतीच्या आठवणीने ढसाढसा रडली आणि यानंतर काय तर रूबीनाच्या पतीवर अर्थात अभिनव शुक्लावर उलटली. ‘क्या मैं रूबीना के पति को चुरा लूं?’ असा सवाल तिने केला. तिच्या या प्रश्नाने बिग बॉसही हैराण झालेत.

‘बिग बॉस 14’चा एक प्रोमो सध्या व्हायरल होतोय. हा प्रोमो इतका मजेदार आहे की, क्षणात तो व्हायरल झाला. यात राखी कन्फेशन रूममध्ये आहे. कन्फेशन रूममध्ये बिग बॉस राखीची विचारपूस करतात आणि राखी ढसाढसा रडू लागते. माझ्या पतीने सर्वांसमोर यावे, असे मला वाटतेय. मी सर्वांच्या नवºयांना पाहते, तेव्हा मला काही व्हायला लागते. काय मी रूबीनाच्या पतीला चोरू? तुम्हाला एखादी व्यक्ती आवडली तर तिला लाईक करणे गुन्हा आहे का बिग बॉस? असे ती म्हणते. यावर अजिबात गुन्हा नाही, असे बिग बॉस म्हणतात.  
हा प्रोमो पाहून येत्या एक-दोन दिवसांत राखीचा पती रितेश बिग बॉसच्या घरात येईल, असे मानले जातेय. राखीच्या पतीला अद्याप कोणीही पाहिले नाही. मात्र हाच राखीचा पती आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे.

एका मुलाखतीत खुद्द राखीच्या पतीने याबद्दल माहिती दिली होती. मी स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस 14’च्या घरात जाण्यास इच्छूक आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी मोकळा आहे आणि मी घरात जाऊ इच्छितो. राखीला सपोर्ट करण्यासाठी मला बिग बॉसच्या घरात जायचे आहे, असे रितेशने सांगितले होते.

Bigg Boss 14 : ‘एंटरटेनमेंट’च्या नादात राखी सावंतने ओलांडल्या सर्व मर्यादा, संतापले स्पर्धक

बिग बॉसमध्ये दिसणार राखी सावंतचा पती?

Web Title: bigg boss 14 rakhi sawant cries and says now want my husband to come in front of all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.