Bigg Boss 12: श्रीसंतला मिळाली तोफेची सलामी, भडकले चाहते!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 19:20 IST2018-09-24T19:19:07+5:302018-09-24T19:20:28+5:30
संतला यानंतर बिग बॉसकडून तोफेची सलामी दिली गेली. ही तोफेची सलामी बिग बॉसच्या चाहत्यांना ठाऊक आहेच.

Bigg Boss 12: श्रीसंतला मिळाली तोफेची सलामी, भडकले चाहते!!
‘बिग बॉस 12’चा पहिला वीकेंड चांगलाच धमाकेदार राहिला़ वरूण धवन आपल्या ‘सुई धागा’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस 12’च्या सेटवर पोहोचला. त्याने ‘बिग बॉस 12’च्या घरातील स्पर्धकांची धम्माल मस्ती केली. यादरम्यान पिलो कवर्स विणण्याच्या टास्कने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या टास्कदरम्यान बिग बॉसच्या घरातील दोन्ही ग्रूपमध्ये चांगलीच रस्सीखेच झाली आणि शेवटी सेलिब्रिटी ग्रूपला मात देत कॉमन कंटेस्टंटनी हा टास्क जिंकला. यापश्वात सेलिब्रिटी ग्रूपमधील कुण्या एकाला दोषी ठरवायचे होते. यासाठी श्रीसंत स्वत: समोर आला आणि त्याने स्वत:नेच त्याचे नाव दिले. पण यानंतर जे काही झाले ते चाहत्यांना अजिबात आवडले नाही़.श्रीसंतला यानंतर बिग बॉसकडून तोफेची सलामी दिली गेली. ही तोफेची सलामी बिग बॉसच्या चाहत्यांना ठाऊक आहेच.
ज्याला कुणाला ही सलामी मिळते, त्याचा चेहरा काळा केला जातो. श्रीसंतसोबतही हेच झाले आणि त्याचे चाहते भडकले, चाहत्यांनी आपला हा संताप सोशल मीडियावर बोलून दाखवला. यानंतर अनेक चाहत्यांनी बिग बॉसला पक्षपाती ठरवले.
अनेकांनी श्रीसंतला मिळालेल्या या सलामीची निंदा केली. काहींना याला ‘हार्ट ब्रेकिंग सीन’ ठरवले तर काहींनी हा प्रकार अतिशय असभ्य असल्याचे म्हटले.
श्रीसंत काय कुणासोबतचं हा असला अपमानास्पद प्रकार होऊ नये, असेही अनेकांनी सुचवले.
तोफेच्या सलामीच्या नावाखाली स्पर्धकांच्या तोंडाला काळे फासणे हे कुठले मनोरंजन? असा सवाल अनेक चाहत्यांनी केला. आता बिग बॉस यावर काय भूमिका घेतात, ते बघूच.
‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताचं भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू श्रीसंतने वाद ओढवून घेतला होता. सबा खान आणि सोमी खानसोबत पहिल्याचं दिवशी त्याचे इतके कडाक्याचे भांडण झाले की, श्रीसंतने घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. ‘बिग बॉस’च्या प्रवेशद्वारापाशी उभा होऊन दरवाजा उघडा, मला बाहेर जावू द्या, अशी विनंती करताना तो दिसला होता. आता श्रीसंत या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. यापूर्वी श्रीसंत ‘झलक दिखला जा’मध्ये दिसला होता. हा शो सुद्धा श्रीसंतने मध्येच सोडून दिला होता.