बाप रे बाप, डोक्याला ताप...! शिल्पा शिंदेने त्रासली, लीगल अ‍ॅक्शनची धमकी दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 11:12 AM2020-12-15T11:12:53+5:302020-12-15T11:14:16+5:30

शिल्पा शिंदे सध्या जाम वैतागली आहे. कारण काय, तर बिग बॉसच्या नावावर तिच्या नावाने पेरल्या जाणा-या अफवा

bigg boss 11 winner shilpa shinde lashes out on those people who are spreading fake news by using her name | बाप रे बाप, डोक्याला ताप...! शिल्पा शिंदेने त्रासली, लीगल अ‍ॅक्शनची धमकी दिली

बाप रे बाप, डोक्याला ताप...! शिल्पा शिंदेने त्रासली, लीगल अ‍ॅक्शनची धमकी दिली

googlenewsNext
ठळक मुद्देशिल्पा शिंदे लवकर डिजिटल माध्यमात पदार्पण करते आहे. ‘पौरषपूर’ या वेब सीरिजमध्ये ती झळकणार आहे.  

‘बिग बॉस 11’ची विजेती राहिलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे सध्या जाम वैतागली आहे. कारण काय, तर बिग बॉसच्या नावावर तिच्या नावाने पेरल्या जाणा-या अफवा. या अफवांमुळे शिल्पा इतकी त्रासली की, आता तिने थेट अशा अफवा पेरणा-यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
आता ही काय भानगड आहे तर, गेल्या काही दिवसांपासून शिल्पाच्या नावावर अनेक मुलाखती समोर आल्या आहेत. या मुलाखतीत शिल्पा ‘बिग बॉस 14’च्या स्पर्धकांबद्दल बोलताना, त्यांच्याबद्दल एक ना अनेक दावे करताना दिसतेय. शिल्पा शिंदेच्या मते, तिच्या नावाने खपवल्या जाणा-या या मुलाखतीत फेक असल्याचे म्हटले आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ती अशा फेक न्यूज पसरवणा-यांवर चांगलीच बरसली.

मी ‘बिग बॉस 14’ बघत नाहीये, मी ‘बिग बॉस 14’मधील स्पर्धकाबद्दल काहीही बोललेले नाही. कुठलीही मुलाखत दिलेली नाही. माझे ट्विटरवर कुठलेही अकाऊंट नाही. माझ्या नावावर अनेक फेक अकाऊंट आहेत. अशा फेक ट्विटच्या आधारावर खोट्या बातम्या देऊ नका. मी मीडियाला सुद्धा ही विनंती करते. हे सगळे थांबवा अन्यथा मला फेक आयडीविरोधात कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे शिल्पाने या व्हिडीओत म्हटले आहे.

शिल्पा शिंदे लवकर डिजिटल माध्यमात पदार्पण करते आहे. ‘पौरषपूर’ या वेब सीरिजमध्ये ती झळकणार आहे.  यामध्ये शिल्पा राणी मीरावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. पौरषपूरच्या निमित्ताने ब-याच दिवसांनी प्रेक्षकांना मिस्ट्री आणि सस्पेन्स हा जॉनर एकत्र पाहायला मिळणार आहे. यामध्ये शिल्पा अगदी हटके लूकमध्ये दिसणार आहे. 
2017 मध्ये बिग बॉसचे 11 वे सीझन जिंकल्यानंतर शिल्पा ‘पटेल की पंजाबी शादी में’ या चित्रपटात एक डान्स नंबर करताना दिसली. यानंतर तिने काही रिअ‍ॅलिटी शो केलेत. पण यापेक्षा कुठलेही मोठे यश तिच्या पदरी पडले नाही. कामापेक्षा वेगवेगळ्या मुद्यावरच्या वक्तव्यांमुळेच ती अधिक चर्चेत राहिली.

बिग बॉस फेम शिल्पा शिंदे पहिल्यांदाच दिसणार महाराणीच्या भूमिकेत, बोल्ड लूकमधील फोटो होतोय व्हायरल

Web Title: bigg boss 11 winner shilpa shinde lashes out on those people who are spreading fake news by using her name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.