Bigg Boss 11 : ...तर यामुळे नाइटी परिधान करतेय अर्शी खान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 03:28 PM2017-11-17T15:28:44+5:302017-11-17T21:01:07+5:30

बिग बॉसचा ११वा सीजन अनेक अर्थांनी चर्चिला जात आहे. शोच्या पहिल्या दिवसापासूनच घरात वादाला सुरुवात झाली असून, त्यानंतर घडत ...

Bigg Boss 11: ... so Arshi Khan is wearing knight !! | Bigg Boss 11 : ...तर यामुळे नाइटी परिधान करतेय अर्शी खान!!

Bigg Boss 11 : ...तर यामुळे नाइटी परिधान करतेय अर्शी खान!!

googlenewsNext
ग बॉसचा ११वा सीजन अनेक अर्थांनी चर्चिला जात आहे. शोच्या पहिल्या दिवसापासूनच घरात वादाला सुरुवात झाली असून, त्यानंतर घडत असलेले किस्से थक्क करणारे ठरत आहेत. त्याचबरोबर काही स्पर्धकांच्या अदा आणि त्यांची स्टाइलही बाहेरील जगतात हॉट टॉपिक बनत आहेत. त्यामध्ये सर्वांत आघाडीवर अर्शी खान ही असून, तिची नाइटी सध्या संपूर्ण देशात चर्चिली जात आहे. खरं तर विकास गुप्ताच्या आग्रहास्तव तिने नाइटी परिधान करणे आता बंद केले आहे. परंतु तिच्या पब्लिसिस्ट फ्लिन रेमेडियोजने याबाबतचा खुलासा केला आहे की, वास्तविक जीवनातही अर्शी खान नाइटी क्वीन आहे. तिला नाइटी घालायला खूप आवडते. याची झलक आतापर्यंत बिग बॉसच्या घरात बघावयास मिळाली आहे. 



रेमेडियोजने सांगितलेल्या माहितीनुसार, अर्शी खानला नाइटी घालायला खूप आवडतात. त्यामुळेच तिच्याकडे ५०० पेक्षा अधिक नाइटींचे कलेक्शन आहे. जेव्हा अर्शी घरी असते अन् कोणी गेस्ट येणार नसतील तर अर्शी नाइटी घालून घरात वावरणे पसंत करते. आश्चर्याची बाब म्हणजे अर्शी खानने ‘काफ्तान-लाइफ नाइटीज्’ नावाने एक ब्रॅण्डही लॉन्च केला होता. परंतु पुरेसा फंड नसल्याने अन् नॅशनल मार्केटिंगकडून फारसा पाठिंबा मिळाला नसल्याने तिचा हा ब्रॅण्ड फारसा यशस्वी झाला नाही. 



आता अरब देशात किंवा अफगानिस्तानमध्ये काफ्तानचा कोट ओवरड्रेससारखा परिधान केला जातो. मात्र काहीही असो, सध्या अर्शी खानची नाइटीज् प्रचंड लोकप्रिय झाली असून, त्याचीही सध्या चर्चा रंगत आहे. कदाचित बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अर्शीच्या या नाइटीज् ब्रॅण्डला मदतही मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Bigg Boss 11: ... so Arshi Khan is wearing knight !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.