Bigg Boss 11:यंदाच्या सिझनमध्ये सहभागी होणार रोहन मेहराची गर्लफ्रेंड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 13:45 IST2017-08-11T08:15:58+5:302017-08-11T13:45:58+5:30

'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो पहिल्या सिझनपासूनच खूप लोकप्रिय ठरला आहे.सेलिब्रेटींच्या आयुष्यातील काही गुपितं या शोच्या माध्यमातून रसिकांना कळतात. ...

Bigg Boss 11: Rohan Mehrachi girlfriends to participate in this season? | Bigg Boss 11:यंदाच्या सिझनमध्ये सहभागी होणार रोहन मेहराची गर्लफ्रेंड?

Bigg Boss 11:यंदाच्या सिझनमध्ये सहभागी होणार रोहन मेहराची गर्लफ्रेंड?

'
;बिग बॉस' हा रिअॅलिटी शो पहिल्या सिझनपासूनच खूप लोकप्रिय ठरला आहे.सेलिब्रेटींच्या आयुष्यातील काही गुपितं या शोच्या माध्यमातून रसिकांना कळतात. या घरात होणारे सेलिब्रेटींच्या वादांमुळे हा शो सगळ्यात जास्त वादग्रस्त शो म्हणून प्रचलित आहे.आता 'बिग बॉसचे 11' वे पर्व रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सिझनची रसिकांना उत्सुकता लागलीय. या शोबद्दल आणि यातील स्पर्धकांबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातायत.आता या शोमध्ये टीव्ही अभिनेता रोहन मेहराची गर्लफ्रेड कांची सिंहचं नाव समोर येतंय.गेल्या सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी 'ये रिश्ता  क्या  कहलाता है'मालिकेत नक्ष ही भूमिका साकारणारा रोहन मेहराने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेला सोडचिठ्ठी दिली होती. आता बिग बॉस 11 व्या सिझनसाठी कांची सिंहदेखील ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत कांची ‘गायु’ही भूमिका साकारत आहे.मालिकेत तिच्या भूमिकेला पाहिजे तितके महत्त्व दिले जात नसल्यामुळे तिचे काम ती एन्जॉय करू शकत नाहीय.मुळात कांची 'गायु' या भूमिकेमुळे फारशी खूश नाहीय.त्यामुळे ती सध्या दुस-या कोणत्या मालिकेत मुख्य भूमिकेच्या शोधातही असल्याचे समजतंय.तिला तिच्या कामामुळे एक अभिनेत्री म्हणून अधोरेखित होता येईल अशा भूमिका भविष्यात करायच्या आहेत.त्यामुळे कांची 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिका सोडणार असल्याचे समजतंय.कांची सध्या तिच्या लूकवरही खूप मेहनत घेतेय. तिने नुकताच मेकओव्हर केला आहे.तिचा हा लूक खूप गॉर्जिअस दिसत असून सोशल मीडियावर तिच्या फोटोंना खूप चांगल्या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.त्यामुळे नव्या मेकओव्हरमुळे कांची लवकरच काही तरी हटके करणार असेच दिसतंय. 

Web Title: Bigg Boss 11: Rohan Mehrachi girlfriends to participate in this season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.