Bigg Boss 11 : लाइट बंद होताच पुनीष शर्मा अन् बंदगी कालरात रंगतोय रोमान्स, प्रेक्षकांमध्ये संताप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 18:40 IST2017-11-09T13:07:25+5:302017-11-09T18:40:39+5:30
बिग बॉस सीजन ११ सुरू असून, पहिल्या दिवसापासून हा सीजन वादाच्या भोवºयात सापडत आहे. सुरुवातीला जुबेर खान प्रकरण समोर ...

Bigg Boss 11 : लाइट बंद होताच पुनीष शर्मा अन् बंदगी कालरात रंगतोय रोमान्स, प्रेक्षकांमध्ये संताप!
ब ग बॉस सीजन ११ सुरू असून, पहिल्या दिवसापासून हा सीजन वादाच्या भोवºयात सापडत आहे. सुरुवातीला जुबेर खान प्रकरण समोर आले. त्यानंतर शिल्पा शिंदे अन् विकासमधील वाद जगजाहीर झाला. पुढे अर्शी खानच्या गोवा-पुणे कनेक्शनने खळबळ उडवून दिली. तर आता पुनीष शर्मा आणि बंदगी कालराचा रोमान्स चर्चेचा विषय ठरत आहे. हे दोघे बिग बॉसच्या घरात एवढ्या बिनधास्तपणे रोमान्स करीत आहेत की, प्रेक्षकांनाच आता या दोघांचा संताप यायला लागला आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक या शोचा होस्ट असलेल्या सलमान खानवरही टीका करीत असून, शोचा टाइम रात्री बारा वाजता का ठेवला नाही? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
![]()
वास्तविक बिग बॉसच्या घरात लव्ह आणि रोमान्स काही नवा नाही. यापूर्वीदेखील बºयाचशा स्पर्धकांमध्ये शोदरम्यान प्रेम जुळले. काही प्रमाणात त्यांच्यात रोमान्सही बघावयास मिळाला. परंतु ज्या पद्धतीने पुनीष आणि बंदगीमध्ये रोमान्स रंगत आहे, त्यावरून हे दोघे जरा अतिच करीत असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांचा लिपलॉक सीन चर्चेत आला होता. घरातील लाइट जरी बंद केले जात असले तरी कॅमेरे सुरूच असल्याचे भान या दोघांनी ठेवले नाही. दोघेही बिनधास्तपणे एकमेकांना किस करीत असल्याने हे दोघे सध्या चर्चेत आहेत.
![]()
सध्या पुनीष बिग बॉसच्या घरात कॅप्टन असून, रॉकेट लग्झरी टास्कमध्ये त्याला संचालकाची भूमिका पार पाडायची होती. यादरम्यान त्याला सर्व स्पर्धकांवर लक्ष ठेवायचे होते. सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी त्याला टास्कमधील सर्व स्पर्धकांवर तिक्ष्ण नजर ठेवायची होती. परंतु पुनीषने संचालक म्हणून फारशी जबाबदारी न पार पाडता बंदगीच्या मिठीत जाणे पसंत केले. टास्क ज्याठिकाणी सुरू होता तेथून तो बंदगीकडे जात होता. विशेष म्हणजे जेव्हा घरातील लाइट बंद झाले तेव्हा पुनीषने टास्क सोडून बंदगीसोबत बेड शेअर केला. दोघांमध्ये बराच काळ रोमान्स सुरू होता. दोघांनी कॅमेºयाची परवा न करता बिनधास्तपणे लिप लॉक आणि लवी-डवी मूमेंट शेअर केले.
![]()
पुनीष आणि बंदगीचा हा रोमान्स मात्र प्रेक्षकांचा संताप वाढविताना दिसत आहे. या दोघांनी घरातील अश्लीलपणा बंद करावा, अशी प्रतिक्रिया आता समोर येत आहे. त्याचबरोबर सलमान खान नेहमीच स्वत:ला या गोष्टींपासून दूर ठेवतो, माझा शो परिवारातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पहावा असा त्यांचा आग्रह असतो. परंतु ज्या पद्धतीने पुनीष आणि बंदगी घरात वावरत आहेत, त्यावरून सलमान आता या दोघांना समज देणार काय? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.