Bigg Boss 11 : गहना वशिष्ठचा दावा; बिग बॉसचा सिजन ११ अगोदरच करण्यात आला फिक्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 15:18 IST2017-12-26T09:48:46+5:302017-12-26T15:18:46+5:30

बिग बॉसचा ११ वा सिजन आता अतिशय रंजक अशा स्थितीत पोहोचला असून, ग्रॅण्डफिनालेसाठी घरातील प्रत्येक स्पर्धकाकडून डावपेच आखले जात ...

Bigg Boss 11: Jewel Vashistra claims; Big Boss Season 11 Already Fixed !! | Bigg Boss 11 : गहना वशिष्ठचा दावा; बिग बॉसचा सिजन ११ अगोदरच करण्यात आला फिक्स!!

Bigg Boss 11 : गहना वशिष्ठचा दावा; बिग बॉसचा सिजन ११ अगोदरच करण्यात आला फिक्स!!

ग बॉसचा ११ वा सिजन आता अतिशय रंजक अशा स्थितीत पोहोचला असून, ग्रॅण्डफिनालेसाठी घरातील प्रत्येक स्पर्धकाकडून डावपेच आखले जात आहेत. मात्र गहना वशिष्ठ हिने या शोबद्दल एक धक्कादायक दावा केल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. त्याचे झाले असे की, गेल्या आठवड्यात अर्शी खान घराबाहेर पडली असून, ती विकास गुप्ताचे प्रचंड कौतुक करताना दिसत आहे. मात्र मॉडेल अर्शी खानची क्लासमेट राहिलेल्या गहना वशिष्ठने अर्शीच्या या कौतुक करण्यामागचे खरे कारण सांगितले आहे. गहनाने म्हटले की, विकास गुप्ताने अर्शीला बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर एका शोमध्ये काम मिळवून देण्याचे खोटे वचन दिले आहे. तसेच बिग बॉस हा शो फिक्स असल्याचे म्हटले आहे. गहनाच्या या आरोपांमुळे सध्या एकच खळबळ निर्माण झाली आहे. 

गहनाने म्हटले की, विकास धूर्त आणि मास्टरमाइंड आहे. त्याने अर्शीच्या एविक्शनसाठी खूपच धूर्तपणाने प्लॅन केले होते. त्यासाठी त्याने अर्शी खान, हीना खान आणि शिल्पा शिंदे या अतिशय स्ट्रॉँग स्पर्धकांमध्ये वैर निर्माण केले. त्यामुळे झाले असे की, या तिघींमधील मतभेदांमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यातच अर्शीने शिल्पाबरोबर खूपच खालच्या स्तरावर जात वाद घातल्याने तिचे चाहते तिच्यापासून दुरावले गेले. परिणामी ती घराबाहेर पडली. मात्र हे सर्व घडवून आणण्यासाठी विकासची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. कारण तो हे सर्व काही अगोदरच जाणून होता. 

कलर्सच्या क्रिएटिव्ह टीममध्ये विकासचे बरेसचे मित्र आहेत. त्यामुळे हे सर्व काही अगोदरच फिक्स असावे अशी शंकाही गहनाने व्यक्त केली. पुढे बोलताना गहनाने म्हटले की, मी पहिल्या दिवसांपासून सांगत आहे की, बिग बॉसचा हा सिजन अगोदरच फिक्स आहे. विकास, शिल्पा, प्रियांक आणि बंदगी सुरुवातीपासूनच एकमेकांना ओळखतात. हीना खान तर नेहमीच विश्वासाने सांगते की, ती शोबाहेर कधीच पडणार नाही. कालच्याच एपिसोडमध्ये हीना लवसमोर दावा करताना बघावयास मिळाली की, ती अखेरपर्यंत शोच्या बाहेर पडणार नाही. खरं तर शोच्या सुरुवातीलाच म्हटले होते की, ती शोच्या १३ व्या आठवड्यापर्यंत घराबाहेर पडणार नाही. आता तसेच घडताना दिसत आहे. 



खरं तर विकास, हीना आणि शिल्पा यांना अखेरपर्यंत शोच्या बाहेर काढले जाणार नाही. शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ताचा वादही बनावट होता, ज्यामुळे घरातील इतर सदस्यांवर त्याचा परिणाम झाला. मात्र आकाश ददलानी याने त्यांचा वाद ओळखला. त्याला माहिती होते की, हे दोघे प्लॅनिंग करून शोमध्ये राहण्यासाठी हा वाद करीत आहेत. मी हे सर्व विश्लेषण एपिसोड्स बघूनच करीत आहे. एकूणच विकास गुप्ता ड्रॅकुला असून, फ्रेशर स्पर्धकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यामुळे मी खात्रीशीररीत्या सांगू शकते की हा शो पूर्णपणे फिक्स आहे. 

Web Title: Bigg Boss 11: Jewel Vashistra claims; Big Boss Season 11 Already Fixed !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.