Bigg Boss 11: Day1: हसिना पारकरच्या जावयाची पहिल्याच दिवशी दादागिरी,म्हणाला मीच आहे TRP
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 12:17 IST2017-10-03T06:32:21+5:302017-10-03T12:17:44+5:30
'बिग बॉस' चा 11वा सिझन सुरू झाला आहे. त्यात बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडपासूनच घरात स्पर्धकांनी एकमेकांना आपला रंग दाखवायला ...

Bigg Boss 11: Day1: हसिना पारकरच्या जावयाची पहिल्याच दिवशी दादागिरी,म्हणाला मीच आहे TRP
' ;बिग बॉस' चा 11वा सिझन सुरू झाला आहे. त्यात बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडपासूनच घरात स्पर्धकांनी एकमेकांना आपला रंग दाखवायला सुरूवात केली आहे. यंदाही कॉमनर्स आणि सेलेब्रिटी अशी थिम असलेल्या घरात पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांमध्ये खटके उडायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आगे-आगे देखो होता है क्या? अशीच चर्चा सध्या रंगु लागली आहे.पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात अशांतता पसरली आहे. त्यात आता डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरचा जावई अशी ओळख असणा-या जुबैर खानने महिलांसमोर एक अश्लिल विनोद सदस्यांना ऐकवला. जुबैरच्या अशा वागण्याचा मात्र सपना चौधरीने चांगलाच समाचार घेतला. महिलांसमोर अशा प्रकारचे अपशब्द वापरल्यामुळे कंटेस्टंट सपना चौधरी चांगलीच संतापली आणि जुबैर खानला महिलांसमोरच अशा प्रकारे विनोद करणे चुकीचे आहे. जेव्हा काहीच घडले नव्हते मजा मस्करीतही तुम्ही अशा प्रकारे अश्लिल शब्दप्रयोग करता ते ही एका नॅशनल टीव्हीवर.जुबैरचा फक्त सपना चौधरीलाच नाही तर इतर महिला स्पर्धकांनाही त्या गोष्टीचा राग आला. जुबैरने आपण आपल्या घरात नाही तर एका नॅशनल टीव्ही वर आहोत याचे भान ठेवण्याची गरज होती.'मी जसा आहे, तसाच राहणार कोणी माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नका.मी स्वत: एक टीआरपी आहे. आज मी प्रत्येक न्युज पेपरच्या फ्रेंटपेजवर हेडलाईन म्हणून झळकतो' असे जुबैरने घरात बोलण्यास सुरूवात केली.कंटेस्टंट पुनीश शर्माही सपनाचे म्हणणे योग्य असल्याचे म्हणत जुबैरला समजावू लागला. पण जुबैरने चूक मान्य न करता तो सपना आणि पुनीश यांच्यावर भडकला.दोघांमध्ये चांगलाचा वाद होणार होता. जुबैरने रागात शर्ट काढून फेकला. पण इतर कंटेस्टंटने मध्यस्थी करत वाद मिटवला.
Also Read:Bigg Boss 11 : आजही सलमान खान त्या व्यक्तीला विसरू शकला नाही,जाणून घ्या कोण आहे तो?
त्यानंतर हिना खानने जुबैरने जे काही म्हटले ते चुकीचे होते अशी जाणीव जुबैरला करून दिली.बिग बॉसच्या घरात कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून वाद रंगलेले आपण पाहतोय. बिग बॉस घर म्हटले की वाद आणि रोमान्स हे आपल्याला प्रत्येक सिझनला पाहायला मिळणारा सिक्वेस आहे. यंदाही असाच रोमँटीक सिक्वेन्स आपल्याला लवकरच बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे. आता ते नेमके कपल कोण आहेत ते ही वेळ आल्यावर कळणारच आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात अशांतता पसरली असल्याचे पाहायला मिळाले.