Bigg Boss 11 : अर्शी खानने आकाश ददलानीसोबत केले अश्लील कृत्य, व्हिडीओमध्ये झाले उघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 20:57 IST2017-11-02T15:27:38+5:302017-11-02T20:57:38+5:30

बिग बॉसच्या घरात अर्शी खानला एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे. यादरम्यान तिने अशा काही करामती केल्या की, घराबाहेरच्या ...

Bigg Boss 11: Arshi Khan made the film with Sky Dadlani! | Bigg Boss 11 : अर्शी खानने आकाश ददलानीसोबत केले अश्लील कृत्य, व्हिडीओमध्ये झाले उघड!

Bigg Boss 11 : अर्शी खानने आकाश ददलानीसोबत केले अश्लील कृत्य, व्हिडीओमध्ये झाले उघड!

ग बॉसच्या घरात अर्शी खानला एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे. यादरम्यान तिने अशा काही करामती केल्या की, घराबाहेरच्या दुनियेत ती चांगलीच हिट झाली आहे. खरं तर अर्शीची घरातील वागणूक पहिल्या दिवसापासून विक्षिप्त आहे. कधी ती हितेन तेजवानीबरोबर फ्लर्ट करताना दिसली तर कधी इतर सदस्यांशी वाद घालताना दिसली. मात्र यावेळेस अर्शीने असे काही केले, ज्यामुळे तिच्या चाहत्यांची मने तुटली नसतील तरच नवल. काल रात्रीच्या एपिसोडमधील एका अनसीन व्हिडीओमध्ये अर्शी आकाश ददलानीची पॅण्ट ओढताना दिसली. परंतु आज तिने जे काही केले, ते शब्दात सांगणे मुश्कील आहे. होय, अर्शी आकाशच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करताना दिसली. अर्शीचा हा अश्लीलपणा बघून आम्हाला काही काळ धक्का बसला. परंतु पब्लिसिटी स्टंटसाठी अर्शी कुठल्याही स्तराला जाऊ शकते हेच तिच्या या उपद्व्यापावरून स्पष्ट होते. 

त्याचे झाले असे की, अर्शी आणि आकाश डायनिंग टेबलवर बसलेले असतात. दोघे आपापसात खूप चेष्टा मस्करी करीत असतात. मात्र अर्शीच्या काही गोष्टी आकाशला अजिबातच आवडत नसल्याने तो टेबलवरून उठून जातो. कॅमेºयासमोर तो बिग बॉसकडे अर्शीची तक्रार करताना म्हणतो की, ती त्याला खूप त्रास देत आहे. पुढे विकासही या दोघांच्या चर्चेत उडी घेत अर्शीला समजावून सांगतो की, तिने असे काही करू नये. 



त्यामुळेच या आठवड्यात अर्शी आणि आकाशमध्ये खूप दुरावा निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच कुशन बाजार टास्कमध्ये आकाश अर्शीसोबत नव्हे तर शिल्पा शिंदेसोबत उभा राहिला. एवढेच नव्हे तर केवळ शिल्पामुळे त्याने टास्कमध्ये जिंकलेले सर्व पैसे घरातील इतर सदस्यांना दिले. तर अर्शी आकाशवर यामुळे नाराज होती की त्याने शिल्पाला सांगितले, ती त्याला केवळ टास्कपुरतेच युज करीत आहे. खरं तर अर्शी आणि आकाशमधील मैत्री सुरुवातीपासूनच बघावयास मिळाली. परंतु अर्शीने आकाशबरोबर केलेल्या या अश्लील प्रतापामुळे दोघांमध्ये आता दुरावा निर्माण झाला आहे. सध्या अर्शी विकास आणि मेहजबी सिद्दिकीबरोबर कालकोठरीची शिक्षा भोगत आहे. 

Web Title: Bigg Boss 11: Arshi Khan made the film with Sky Dadlani!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.