Bigg Boss 11 : मोनालिसाच्या मते ‘हे’ दोन सदस्य जिंकू शकतात बिग बॉसची ट्रॉफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 18:34 IST2017-12-07T13:04:28+5:302017-12-07T18:34:28+5:30

टीव्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखला जाणारा ‘बिग बॉस’ हा शो आता ग्रॅण्डफिनालेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सध्या ...

Bigg Boss 11: According to Monalisa, the two members can win the 'Big Boss' trophy! | Bigg Boss 11 : मोनालिसाच्या मते ‘हे’ दोन सदस्य जिंकू शकतात बिग बॉसची ट्रॉफी!

Bigg Boss 11 : मोनालिसाच्या मते ‘हे’ दोन सदस्य जिंकू शकतात बिग बॉसची ट्रॉफी!

व्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखला जाणारा ‘बिग बॉस’ हा शो आता ग्रॅण्डफिनालेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सध्या शो एका मजेशीर वळणावर असून, घरातील सदस्यांमध्ये दिवसागणिक वाद पेटताना दिसत आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांकडून हादेखील अंदाज लावला जात आहे की, अखेर घरातील तो कोण सदस्य आहे, जो या शोचा विजेता ठरेल? दरम्यान, सीजन १० ची स्पर्धक असलेल्या मोनालिसाने तर शोच्या विजेत्यांची नावेही घोषित केली आहेत. मोनालिसाच्या मते, टीव्हीवरील भाभीजी अर्थात शिल्पा शिंदे हा शो जिंकू शकते. त्याचबरोबर विकास गुप्ता यालादेखील हा शो जिंकण्याची संधी आहे. 

मोनालिसा अगोदर ‘ये हैं मोहब्बते’चा स्टार करण पटेल यानेदेखील विजेत्यांच्या नावांची घोषणा केली होती. दरम्यान, मोनालिसा तिच्या आगामी ‘प्रेमग्रंथ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत तिने म्हटले की, ‘या सीजनमध्ये प्रचंड भाडणे होत आहेत. जवळपास सर्वच सदस्यांनी आतापर्यंत एकमेकांना प्रचंड शिवीगाळ केली आहे. सुरुवातीला याबाबतचा अंदाज लावणे मुश्कील होत होते की, या सीजनचा विजेता कोण असेल? परंतु गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींवरून मला असे वाटते की, शिल्पा शिंदे या शोचा ताज आपल्या नावे करणार. काही कारणांमुळे शिल्पासोबत माझे कनेक्शन चांगले असल्याचेही मोनालिसाने सांगितले. 

शिल्पाविषयी सांगायचे झाल्यास घरातील सर्वच सदस्य तिला ‘मां’ म्हणून बोलावितात. कलर्सने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये दिसत आहे की, शिल्पा तिच्या आईची भेट घेत आहे. यावेळी शिल्पाच्या आईने सर्व सदस्यांना विनंती केली की, जर तुम्ही सर्व तिला ‘मां’ म्हणत असाल तर कृपा करून तिला शिवीगाळ करू नका. यावेळी सर्व सदस्यांसह प्रेक्षकही चांगलेच भावुक झाल्याचे दिसून आले. 

Web Title: Bigg Boss 11: According to Monalisa, the two members can win the 'Big Boss' trophy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.