Bigg Boss 10 : करण जोहरकडून मोनालिसाला सिनेमाची आॅफर; तिच्या लग्नावरही मारला टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 14:11 IST2017-01-24T06:52:20+5:302017-01-24T14:11:33+5:30

कॉन्ट्रोर्व्हसियल रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसने शोमध्ये सहभागी झालेल्या कित्येक स्पर्धकांच्या करिअरला दिशा देण्याचे काम केले आहे. बरेचसे स्पर्धक तर ...

Bigg Boss 10: Karan Johar returns to Monalisa cinema; Tucked on her wedding | Bigg Boss 10 : करण जोहरकडून मोनालिसाला सिनेमाची आॅफर; तिच्या लग्नावरही मारला टोमणा

Bigg Boss 10 : करण जोहरकडून मोनालिसाला सिनेमाची आॅफर; तिच्या लग्नावरही मारला टोमणा

न्ट्रोर्व्हसियल रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसने शोमध्ये सहभागी झालेल्या कित्येक स्पर्धकांच्या करिअरला दिशा देण्याचे काम केले आहे. बरेचसे स्पर्धक तर बॉलिवूडमध्ये स्थिरावले आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस सिझन-१० ची सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक प्रियंका जग्गा हिने एक बॉलिवूड फिल्म साइन केल्याचे समोर आले होते. आता करण जोहरने बिग बॉसची सर्वाधिक हॉट स्पर्धक भोजपुरी अ‍ॅक्ट्रेस मोनालिसाला एक फिल्मसाठी आॅफर केली आहे. धर्मा प्रोडक्शन हाउसबरोबर तिला साइन केले असून, ‘मोना के कर्मा मे धर्मा है’ अशा अंदाजात त्याने ही अनाउन्समेंट केली आहे.  
 


बिग बॉसच्या सेटवर ‘झलक दिखाला जा’चे जेजेस् फराह खान, जॅकलीन फर्नांडिस, करण जोहर, गणेश हेगडे आणि सलमान खान
सलमान खानच्या ‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडमध्ये ‘झलक दिखला जा’च्या फिनालेनिमित्त शोचे जेजेस् आणि कंटेस्टेंट सहभागी झाले होते. यावेळी सलमान खानकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना करणने याबाबतचा खुलासा केला. सलमानने जॅकलीन फर्नांडिज, फराह खान आणि गणेश हेगडे यांना विचारले की, मोनालिसाचा सर्वाधिक फॅन कोन आहे? तेव्हा तिघांनीही करणकडे इशारा करीत तो मोनालिसाचा फॅन असल्याचे म्हटले. त्यानंतर सलमान खानने करण जोहरला विचारले की, तुला असे वाटते का की, मोनालिसा लग्नानंतर अ‍ॅक्टिंग सोडून संसारात व्यस्त होईल? त्यावर करणने म्हटले की, ती हाउस वाइफ म्हणून राहण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. कारण मी अशा अफवा ऐकल्या आहे की, ती लवकरच एक सिनेमात झळकणार आहे. 



कारण ‘ती शोधायला गेली ‘शौहर’ मात्र तिला मिळाला ‘करण जोहर’ अशा अंदाजात त्याने तिच्या बॉलिवूड करिअरचा मार्ग सुसज्ज असल्याचे म्हटले. करण जोहर म्हणाला की, होय मी तिला एक फिल्म आॅफर केली आहे. कारण तिच्या ‘कर्मात धर्मा आहे!’ जेव्हा सलमानने त्याला ही बाब अनाउंस करण्याचे सांगितले तेव्हा करणने लगेचच अनाउंस करीत तिला धर्मा प्रॉडक्शन हाउससाठी साइन केल्याचे म्हटले. त्याचबरोबर माझा तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट तिच्या लग्नापेक्षा अधिक काळ टिकेल, अशी कोपरखळीही मारली.  



घराबाहेर पडल्यानंतर मोनालिसाने तिच्या लग्नाबाबतची एक गोष्ट स्पष्ट केली. ती म्हणजे लग्नासाठी मी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले नाहीत. त्याचबरोबर हा काही पब्लिसिटी स्टंट नव्हता. जेव्हा तिला करण जोहरच्या आॅफर आणि कमेंटविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने याविषयी मला काहीच माहीत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच करण काय म्हणाला हे जाणून घेण्यासाठी मला पूर्ण एपिसोड बघावा लागेल. जर त्याने खरोखरच कॉन्ट्रॅक्टविषयी म्हटले असेल तर माझ्यासाठी हे चांगले संकेत आहेत. कारण त्याचा कॉन्ट्रॅक्ट वर्षांनूवर्ष राहणार असल्याचे तिने स्पष्ट केले. आता करण तिला खरोखरच सिनेमासाठी साइन करणार काय हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: Bigg Boss 10: Karan Johar returns to Monalisa cinema; Tucked on her wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.