Bigg Boss 10 : मोनालिसाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 14:01 IST2017-01-21T08:30:23+5:302017-01-21T14:01:27+5:30

गेल्या बुधवारीच बिग बॉसच्या घरात धुमधडाक्यात लग्न करणाºया भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा घरातील प्रवास संपला असून, ती शोबाहेर पडली आहे. ...

Bigg Boss 10: The journey to the Big Boss house of Monalisa ends | Bigg Boss 10 : मोनालिसाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला

Bigg Boss 10 : मोनालिसाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला

ल्या बुधवारीच बिग बॉसच्या घरात धुमधडाक्यात लग्न करणाºया भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा घरातील प्रवास संपला असून, ती शोबाहेर पडली आहे. या आठवड्यासाठी रोहन मेहरा आणि मोनालिसा नॉमिनेट झाले होते. त्यामध्ये मोनालिसा घराबाहेर पडली असून, आता केवळ पाचच सदस्यांमध्ये ट्रॉफीसाठी धुमश्चक्री रंगणार आहे.

खरं तर सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंडनुसार मोनालिसाला रोहनपेक्षा अधिक व्होट मिळाले होते. त्यामुळे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेचा अभिनेता रोहन मेहरा हा या आठवड्यात घरातून बाहेर पडेल हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र मोनालिसा घराबाहेर पडल्याने तिच्या फॅन्सला धक्का बसला आहे. मोनालिसा शोच्या सुरुवातीपासून चर्चेत राहिलेली सदस्य आहे. घरातील तिचा प्रवास अतिशय रंजक राहिल्याने तिच्या फॅन्सच्या संख्येतही वाढ झाली आहे. 



घरातील मोनालिसाचे काही हॉट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ती या शोची विजेती ठरू शकते, अशी चर्चा रंगली होती. त्यातच मनू पंजाबीसोबतची केमिस्ट्री अन् नंतर बॉयफ्रेंड विक्रांतसिंह राजपूत याच्याशी केलेल्या विवाहामुळे ती लाइमलाइटमध्ये आली होती. त्याचबरोबर भोजपुरी अभिनेता रविकिशन यानेसुद्धा मोनालिसाच या शोची विनर असल्याचे भाकीत केल्याने, ती घरातील स्ट्रॉग सदस्य समजली जात होती. 

परंतु धक्कादायकपणे तिची घरातून एक्झिट झाल्याने आता शोमध्ये रोहन मेहरा, बानी जे, लोपामुद्रा राऊत, मनवीर गुर्जर आणि मनू पंजाबी यांच्यामध्ये फिनाले फाइट होणार आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरात आपल्या बॉयफ्रेंडशी विवाह करून घराबाहेर पडलेली मोनालिसा आनंदी आहे. तिच्या मते शोचा विनर ठरण्यापेक्षाही बिग बॉसने तिला खूप काही दिले आहे. विवाह झाल्याच्या दुसºयाच दिवशी विक्रांतसिंह राजपूत घराबाहेर पडला होता, आता त्याच्यापाठोपाठ मोनालिसाही घराबाहेर पडली आहे. फिनालेसाठी ती बॉयफ्रेंडसोबत उपस्थित राहणार असल्याचे समजते. 

Web Title: Bigg Boss 10: The journey to the Big Boss house of Monalisa ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.