'आई कुठे काय करते'मध्ये मोठा ट्विस्ट, कांचन आजीच्या 'त्या' अटीमुळे गौरी आणि यशमध्ये येणार कायमचा दुरावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 13:43 IST2023-02-24T13:42:33+5:302023-02-24T13:43:01+5:30
Aai Kuthe Kay Karte : नुकतेच अरुंधतीच्या लग्नासाठी गौरीने मालिकेत कमबॅक केले आहे. पण गौरीमुळे आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.

'आई कुठे काय करते'मध्ये मोठा ट्विस्ट, कांचन आजीच्या 'त्या' अटीमुळे गौरी आणि यशमध्ये येणार कायमचा दुरावा?
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत सध्या लग्नसराई पाहायला मिळत आहे. अरुंधती आणि आशुतोषचे लवकरच लग्न धुमधडाक्यात पार पडणार आहे. अरुंधती नवं आयुष्य सुरु करत असताना तिच्या मार्गात संकट येत आहेत. नुकतेच अरुंधतीच्या लग्नासाठी गौरीने मालिकेत कमबॅक केले आहे. पण गौरीमुळे आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.
मालिकेत अरुंधतीचे लग्न रोखण्यासाठी अनिरुद्ध रोज नवनवीन डाव खेळत आहे. पण त्याचे सगळे प्लान फसले असून अरुंधती आणि आशुतोषचे लग्न होणार आहे. गौरी यशला सोडून कायमची अमेरिकेला निघून गेली होती. त्यामुळे त्यांच्यात दुरावा आलेला पाहायला मिळाला. आता ती परत आल्यामुळे त्या दोघांचंही लग्न होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
अरुंधती गौरी आणि यशला जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण कांचन गौरीला यशविषयी अंतिम निर्णय घ्यायला भाग पाडणार आहे. मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात पाहायला मिळत आहे की, कांचन गौरीला म्हणते, 'तू यशला सोडून जायला आली असशील तर उद्याच निघून जा. मला माझ्या नातवाचे मन मोडलेले पाहवणार नाही. तुला इथे थांबायचे असेल तर तुला यशशी लग्न करावे लागेल. तुला काय करायचे आहे तो शब्द आताच दे मला.' कांचन आजीचं हे ऐकून गौरीला चांगलाच धक्का बसतो. आता गौरी यशविषयी नेमका काय निर्णय घेणार, त्याला कायमचे सोडणार की त्याच्याशी लग्न करणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.