बिग बॉसचा एक्स स्पर्धक मनू पंजाबीला गंडविले, पोलिसांत गुन्हा दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 15:48 IST2018-05-05T10:18:21+5:302018-05-05T15:48:21+5:30

बिग बॉस १० मधून प्रसिद्धीझोतात आलेला मनू पंजाबी याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. वृत्तानुसार, मनूचे बॅँक अकाउंट हॅक ...

Big Boss X contestant Manu punishes Gandhian, police booked! | बिग बॉसचा एक्स स्पर्धक मनू पंजाबीला गंडविले, पोलिसांत गुन्हा दाखल!

बिग बॉसचा एक्स स्पर्धक मनू पंजाबीला गंडविले, पोलिसांत गुन्हा दाखल!

ग बॉस १० मधून प्रसिद्धीझोतात आलेला मनू पंजाबी याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. वृत्तानुसार, मनूचे बॅँक अकाउंट हॅक करण्यात आले असून, त्यातून हजारो रुपयांचा परस्पर व्यवहार करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, मनूच्या अकाउंटमधून हॅकर्सनी जवळपास ९० हजार रुपयांची रक्कम परस्पर काढली आहे. एका दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, मनू पंजाबीने स्वत:च या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्याने म्हटले की, ‘सध्या मी खूपच त्रस्त आहे. कारण एका झटक्यातच कोणीतरी माझ्या अकाउंटमधून ९० हजार रुपये काढले आहेत. या अकाउंटचे एटीएम कार्ड माझ्याकडे होते. अशातही अकाउंट हॅक करून तब्बल ९ वेळा त्यातून परस्पर व्यवहार केला गेला. या घटनेमुळे मला चांगलाच धक्का बसला आहे. त्यातून मी अद्यापपर्यंत सावरलो नाही. मला ही बाब अजूनही कळाली नाही की, माझ्या खात्यामधून पैसे कसे काढले गेले?’

दरम्यान, मनू पंजाबीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस त्याबाबत तपास करीत आहेत. वास्तविक पहिल्यांदाच एखाद्या सेलिब्रिटीला अशाप्रकारे गंडविले असे नाही तर यापूर्वीही अनेक स्टार्सला हॅकर्सनी चुना लावला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘साथ निभाना साथिया’ची अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्या हिलादेखील अशाप्रसंगाचा सामना करावा लागला. देवोलीना हिला तिच्या खात्यातून १६ हजार रुपये काढल्याचा मॅसेज मिळाला होता. 

देवोलिना भट्टाचार्याने याविषयी सांगितले होते की, अकाउंटच्या ट्रान्जेक्शनवरून असे दिसून येते की, पैसे सॅन फ्रॉन्सिस्को येथे ट्रान्सफर झाले आहेत. ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा मी लगेचच अकाउंट ब्लॉक केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अकाउंट हॅकच्या समस्येमुळे सर्वच स्टार्सला फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, बिग बॉसचा एक्स स्पर्धक राहिलेल्या मनू पंजाबीच्या अकाउंट हॅकवरून पोलीस आता काय कारवाई करतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

Web Title: Big Boss X contestant Manu punishes Gandhian, police booked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.