अशी सुरू आहे बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:02 IST2018-07-21T17:01:42+5:302018-07-21T17:02:41+5:30

ग्रँड फिनालेची तयारी सुरु झाली असून बिग बॉस मराठीच्या घरामधून जे स्पर्धक बाहेर पडले ते देखील यामध्ये सहभागी असणार आहेत.

Big Boss Marathi Grand Finale | अशी सुरू आहे बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची तयारी!

अशी सुरू आहे बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची तयारी!

संपूर्ण महाराष्ट्र काय तर जग ज्या दिवसाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत होता तो क्षण आला. अवघ्या दोनच दिवसात प्रेक्षकांना कळणार बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा पहिला विजेता. ग्रँड फिनाले म्हणजे धम्माकेदार होणार यात वादच नाही. ज्या कार्यक्रमाची सुरुवातच मुळी इतक्या जोश्यात झाली त्याची सांगता पण तशीच होणार हे तर नक्की.  ग्रँड फिनालेची तयारी सुरु झाली असून बिग बॉस मराठीच्या घरामधून जे स्पर्धक बाहेर पडले ते देखील यामध्ये सहभागी असणार आहेत. अंतिम फेरीमध्ये ६ स्पर्धक पोहचले असून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. आज विकेंडचा डाव मध्ये काय होणार ? कोणते सरप्राईझ मिळणार ? कोणते परफॉर्मन्स बघायला मिळणार ?हे सगळे पाहणे रंजक असणार आहे.
 

ग्रँड फिनालेसाठी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील 6 फायनलिस्ट देखील परफॉर्म करणार आहेत. ज्यामध्ये मेघा, शर्मिष्ठा, आस्ताद, स्मिता, पुष्कर, सई यांचे डान्स बघायला मिळणार आहेत.रेशम टिपणीस, जुई गडकरी, ऋतुजा, सुशांत शेलार, राजेश शृंगारपुरे यांची Rehearsal सुरु झाली आहे. रेशम टिपणीस खल्लास आणि नागीन नागीन या गाण्यावर तर जुई – ऋतुजा आली रे आणि धाकड या गाण्यावर डान्स करणार आहेत. तेजस पुजारीने नृत्यदिग्दर्शन केले आहे.


पुष्कर यांनी आपल्या सिनेमामध्ये सुपरहिरोचे काम केले पण तो खऱ्या आयुष्यामध्ये देखील सुपरहिरो आहे हे त्याने त्याच्या बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाने सिद्ध केले. प्रत्येकवेळी पुष्कर त्याने त्याचा सर्वोत्तम खेळ खेळला. पण तरीही कॅप्टनसीने तीनवेळा हुलकावणी दिली. पण तरीही तो कधीही न खचला नाही आणि त्याने त्याचा खेळ सुरु ठेवला. मित्रांना, मोठ्यांना, स्त्रियांना आदर दिला, तसेच या घरामधील पुष्करच्या प्रवासातील काही महत्वाच्या गोष्टी देखील त्याच्या AV मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळाल्या. तसेच सईला देखील बिग बॉस मराठीच्या घरातील तिचा प्रवास दाखविण्यात येणार आहे. घरातील मैत्री, अडचणी, मेघा – तिचे नाते, सदस्यांनी तिच्यावर केलेले आरोप. हे सगळ बघून दोघे भाऊक झाले. बिग बॉस यांनी दिलेल्या या खास सरप्राईझ मुळे घरातील सदस्य खूप खुश असून त्यांना आता बिग बॉस जिंकल्यासारखेच वाटत आहे असे त्यांनी बिग बॉस यांना सांगितले. आजच्या भागामध्ये मेघा धाडे, आस्ताद, यांना त्यांच्या घरातील प्रवासाची झलक बघायला मिळणार आहे. 
 

Web Title: Big Boss Marathi Grand Finale