बिग बॉस : इमाम सिद्दीकी एका आठवड्यासाठी करणार घरात एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:35 IST2016-12-15T12:22:42+5:302016-12-15T16:35:56+5:30

‘बिग बॉस’ या शोमध्ये कधी काय घडणार हे सांगणे मुश्किल आहे. शोमध्ये ट्विस्ट निर्माण करण्यास माहीर असलेल्या बिग बॉसने ...

Big Boss: Imam Siddiqui will enter the house for a week | बिग बॉस : इमाम सिद्दीकी एका आठवड्यासाठी करणार घरात एंट्री

बिग बॉस : इमाम सिद्दीकी एका आठवड्यासाठी करणार घरात एंट्री

िग बॉस’ या शोमध्ये कधी काय घडणार हे सांगणे मुश्किल आहे. शोमध्ये ट्विस्ट निर्माण करण्यास माहीर असलेल्या बिग बॉसने आता ड्रामा किंग इमाम सिद्दीकीला आठवडाभरासाठी घरात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरात काही काळ का होईना पण, जबरदस्त घमासान बघावयास मिळणार आहे. 

इमाम बिग बॉसचा एक्स कंटेस्टेंट असून, त्याने सीजन-8 मध्ये असे काही कारनामे केले होते, ज्यामुळे प्रेक्षक दंग झाले होते. इमामने शोचा होस्ट सलमान खान याच्याशी देखील पंगा घेण्यास कुठलीच कसर सोडली नव्हती. त्यामुळे तो या सीजनचा सर्वाधिक वादग्रस्त कंटेस्टेंट ठरला होता. आता तो पुन्हा घरात आठवडभरासाठी एंट्री करणार असल्याने घरात अनेक धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 
 
दरम्यान इमामच्या घरातील एंट्रीचा खुलासा आईच्या निधनामुळे काही काळ घराबाहेर पडलेल्या मनू पंजाबी याने केला आहे. त्याने प्रियंका जग्गा हिच्याशी बोलताना त्याने म्हटले होते की, शोचे निर्माते या आठवड्यात इमाम सिद्दीकीला घरात पाठविण्याचा प्लॅन करीत आहेत. जेसन शहा याला अचानक घराबाहेर पडावे लागल्यानेच बिग बॉसने इमामला घरात एंट्री देण्याचे ठरविले असावे असे तो बोलला होता. 

आता इमाम घरात या आठवड्यात एंट्री करणार की पुढच्या आठवड्यात याची प्रतिक्षा असेल. तो घरात आल्यास स्वयंघोषित बाबा स्वामी ओम आणि त्याच्यातील जुगलबंदी जबरदस्त रंगण्याची शक्यता आहे. काहीही असो इमामची एंट्री प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक ठरेल यात शंका नाही. 

Web Title: Big Boss: Imam Siddiqui will enter the house for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.