बिग बॉस हाउस : ...अन् बानीने केले वॉकआउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 14:31 IST2016-12-08T13:36:53+5:302016-12-08T14:31:20+5:30

सतीश डोंगरे बानी आणि लोपामुद्रा राऊत यांच्यातील शाद्बिक जंग दिवसागणिक तीव्र होताना बघावयास मिळत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये यांच्यातील वाद ...

Big Boss House: ... and Bani did walkout | बिग बॉस हाउस : ...अन् बानीने केले वॉकआउट

बिग बॉस हाउस : ...अन् बानीने केले वॉकआउट

<
em>सतीश डोंगरे


बानी आणि लोपामुद्रा राऊत यांच्यातील शाद्बिक जंग दिवसागणिक तीव्र होताना बघावयास मिळत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये यांच्यातील वाद नवे वळण घेत असल्याने दोघींमधील वाद संपेल का नाही असा प्रश्न आता प्रेक्षकांना पड आहे. दोघींमधील एकमेकींप्रतीचे वितुष्ट ऐवढे वाढले की, बिग बॉसच्या घरातच नव्हे तर पत्रकारांसमोरदेखील या दोघी आपसात भिडण्यास मागे सरल्या नाहीत. त्यांच्यातील वाद ऐवढा चिघळला की, अखेर बानीने सर्वांसमोर वॉकआउट करीत लोपाला सुनावले. 



त्याचे झाले असे की, गेल्या बुधवारी बिग बॉस हाउसमध्ये नॉमिनेटेड सदस्य बानी जे, रोहन मेहरा, मनवीर गुर्जर, लोपामुद्रा राऊत, नितिभा कौल, प्रियंका जग्गा, साहील आणि कॅप्टन गौरव चौपडा यांचा सामना पत्रकारांशी झाला. पत्रकार आणि त्यांच्यातील प्रश्न उत्तरांमध्ये कधी बानी, तर कधी लोपा एकमेकींना बघून नाक मुरडत होत्या. पत्रकारांच्या प्रश्नांवर बानी उत्तर द्यायला लागली की, लोपा तिच्याकडे बघून काहीतरी पुटपुटत असे. याच कारणाने त्यांच्यातील वाद एवढा चिघळला की, एकमेकींना वाईट शब्दांचा वापर करीत, विचित्र हावभाव करत त्यांच्यातील शाद्बिक युद्ध चांगलेच चिघळले. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की, अखेर बानीने सर्वांसमोर डोळ्यात अश्रू आणत वॉकआउट केले. 

इन्सिक्योर बानी आणि इनमच्योर लोपा
एक प्रश्नादरम्यान लोपाने बानीला स्वत:पासून इन्सिक्योर म्हटले. लोपाचे म्हणणे होते की, बानी स्वत:ला तिच्यापासून इन्सिक्योर समजते. त्यामुळेच माझ्यासोबत ती चांगली वागत नाही. मात्र बानीने लोपाच्या या उत्तराला चुकीचे आणि बालिश असे म्हटले. ती म्हणाली की, लोपा ही एक लहान मुलगी आहे. जिच्यात मॅच्योरिटीचा प्रचंड अभाव आहे. मात्र बानीच्या या उत्तरावर आक्षेप घेत लोपाने मध्येच बानीच्या वयाची थट्टा उडवित तुझ्यापेक्षा मी वयाने लहान असल्याचे म्हटले.  
मात्र दोघींमधील वाद तेव्हा चिघळला जेव्हा बानीला विचारण्यात आले की, लोपा आणि तुझ्यातील वाद अखेरपर्यंत कायम राहणार का? जसे ‘बिग बॉस सीजन - ६’ मध्ये तुझी जीवलग मैत्रीण गौहर खान आणि तनीषा मुखर्जी यांच्यातील वाद अखेरपर्यंत होता? या प्रश्नाचे उत्तर देताना बानीने म्हटले की, गौहर माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ती खूपच मोठ्या मनाची आहे. मात्र माझ्यामध्ये गौहरसारखी सहनशिलता नाही, जर कोणी माझ्यासोबत चुकीचे वागत असेल तर त्याच्यावर मी नक्कीच पलटवार करेल. बानी पुढे बोलणार तेवढ्यातच लोपाने पुन्हा एकदा तिच्याकडे बघत तिला उलट-सुलट बोलायला सुरुवात केली. त्यामुळे बानीचा एवढा संताप झाला की, मला पत्रकार परिषदेत बोलावले कशाला. लोपा एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ देत नाही. जेव्हा ती बोलते तेव्हा मी मध्ये बोलते का? अशा बालिश मुलीसोबत पत्रकार परिषदेत आयोजित करायचीच कशाला? असे म्हणत तिने पत्रकार परिषदेतून डोळ्यात पाणी आणत वॉकआउट केले. 

प्रियंका तर बानीची ‘चमची’
लोपामुद्रा राऊत आणि बानी जे यांच्यातील वाद तीव्र होत असताना मध्येच प्रियंका जग्गा हिने वादात उडी घेतली. प्रियंकाच्या मते, जेव्हा ती घराबाहेर पडली होती तेव्हा तिला लोपा योग्य आणि बानी चुकीचे असल्याचे वाटत होते. मात्र जेव्हा तिने पुन्हा घरात प्रवेश केला तेव्हा लोपा ही बानीबरोबर विनाकारण वाद घालत असल्याचे जाणवले. लोपा आणि प्रियंकामध्ये सातत्याने तू-तू-मै-मै होत असते. प्रियंकाच्या मते, लोपाने तिच्याशी सुरुवातीला मैत्री केली, मात्र नंतर पाठीत खंजीर खुपसला. प्रियंकाच्या या म्हणण्याला लोपाने जोरदार विरोध केला. ती म्हणाली की, प्रियंका ही तर बानीची ‘चमची’ आहे. तसेच ती मला विचित्र प्रकारे स्पर्श करीत असते, जे मला अजिबात आवडत नसल्याचा आरोपही केला.  

मनू नसता तर घराबाहेर असतो : मनवीर
बिग बॉसच्या घरातील नोयडाचा दबंग स्पर्धक मनवीर गुर्जर मात्र स्वत:ला घरात फारच कमजोर समजत असल्याचे बघावयास मिळाले. त्याच्या मते जर शोमध्ये मनू पंजाबी नसता तर कदाचित मी आतापर्यंत घराबाहेर पडलो असतो. मनू त्याच्या पद्धतीने गेम खेळत असून, मी त्याला पाठिंबा देत आहे. कदाचित तो माझा वापर करीत असेल, पण मला यात काहीच चुकीचे वाटत नाही. मनू आणि माझी मैत्री मोठा आणि लहान भाऊ अशी आहे. मी लहान भावाच्या भूमिकेत आहे, हे मला माहीत आहे. पण मला यात काहीच वावगे वाटत नाही. 
मात्र जेव्हा मनवीरला, मनू हाही एक घरातील स्पर्धक आहे, त्यामुळे तुला त्याच्याशी सामना करावाच लागेल, असे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, मी तेव्हा त्याच्यासोबत नक्कीच गेम खेळणार. परंतु जर तो बिग बॉस विनरसाठी माझ्यापेक्षा योग्य असेल तर त्याच्यासाठी मी विनर ट्राफी सोडायला तयार आहे. 
तसेच रोहन हा माझ्यादृष्टीने खूपच लहान असून, तो माझा कधीही स्पर्धक ठरू शकणार नाही. तो जरी सेलिब्र्रिटी असला तरी, तो माझा कट्टर स्पर्धक आहे असे मला अजिबात वाटत नाही, असेही मनवीर म्हणाला. 

गौरव अनुत्तरित...
पत्रकार परिषदेत गौरवला बानीवरून प्रश्न विचारले जातील याची कदाचित त्याला जाणीव असल्याने, त्याने बानीपासून चार हात लांब बसणे पसंत केले. एका कोपºयात बसलेला गौरव प्रचंड धीरगंभीर दिसत होता. त्याला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर तो बोलणे टाळत होता. विशेषत: बानीवरून विचारलेले प्रश्न तो नेहमीप्रमाणेच अतिशय चलाखीने फिरवत होता. जेव्हा त्याला तू घरात अजूनही सेलिब्रिटीसारखाच वावरतो, कॉमन मॅनला आजही कॉमन मॅनच समजतो, असे विचारण्यात आले तेव्हा त्याचा चेहरा संतापलेल्या अवस्थेत दिसत होता. तो म्हणाला, मी घरातील सर्व लोकांसोबत २४ घंटे वावरत असतो. तुम्ही आम्हाला केवळ ४५ मिनिटेच टीव्हीवर बघत असता, याचा अर्थ मी स्वत:ला वेगळं समजतो असा होत नाही, त्यामुळे मला असे वाटते की, यावर मला उत्तर देता येणार नाही. 

...अन् रोहन झाला खूश 
रोहन बिग बॉस सीजन-१०चा विनर ठरू शकतो, असे जेव्हा त्याला विचारण्यात आले तेव्हा रोहन अतिशय खूश झाला. आतापर्यंत हा माझा सगळ्यात आवडता प्रश्न होता, असेही त्याने लगेचच बोलून दाखविले. तसेच जर मी बिग बॉसचा विनर नाही झालो तर लोपामुद्रा नक्कीच होईल, असे भाकितही केले. कारण लोपा घरात अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत असून, ती या ट्रॉफीची प्रबळ दावेदार ठरू शकते.  

 

Web Title: Big Boss House: ... and Bani did walkout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.