बिग बॉसने दिली चक्क धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 15:57 IST2016-12-21T15:57:40+5:302016-12-21T15:57:40+5:30

बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सीझनमध्ये घडले नसेल असे किस्से सध्याच्या सीझनमध्ये घडत आहेत. कारण आतापर्यंत आपण घरातील सदस्यांच्या कारनाम्यांचा समाचार ...

Big Boss gave a lot of threat | बिग बॉसने दिली चक्क धमकी

बिग बॉसने दिली चक्क धमकी

ग बॉसच्या आतापर्यंतच्या सीझनमध्ये घडले नसेल असे किस्से सध्याच्या सीझनमध्ये घडत आहेत. कारण आतापर्यंत आपण घरातील सदस्यांच्या कारनाम्यांचा समाचार घेताना होस्ट सलमान खानलाच बघितले आहे; मात्र गेल्या दोन एपिसोडमध्ये घडत असलेल्या घडामोडींवरून दस्तुरखुद्द बिग बॉसच घरातील काही सदस्यांचा समाचार घेत आहेत; त्यांचा संताप असा काही होत आहे की, ते चक्क स्पर्धकांना घरातून बाहेर काढण्याच्या धमक्या देत आहेत. आता ते स्पर्धक कोण याचा कदाचित तुम्हाला अंदाज लागला असेलच. 

#OmSwami aka Principal of the hostel task gets furious! Tonight, watch how #BiggBoss warns him & takes a strict action against him! #BB10pic.twitter.com/4qfR3X7DgB— Bigg Boss (@BiggBoss) December 20, 2016 ">http://

}}}}
त्याचे झाले असे की, बिग बॉसने या आठवड्याच्या लक्झरी बजेटसाठी सदस्यांना ‘प्यार का तोहफा’ असा टास्क दिला होता. या टास्कनुसार गौरव-बानी, लोपा-रोहन, मनू-मोनालिसा आणि मनवीर-नितीभा अशा जोड्या ठरविण्यात आल्या होत्या. या टास्कमधून प्रेमसंबंध प्रफुल्लित करून घरात रोमॅण्टिक वातावरण निर्माण करणे हा या टास्कमागचा उद्देश होता. त्यानुसार प्रत्येक जोडीसाठी घरातील लिव्हिंग एरियामध्ये लॉकर ठेवण्यात आले होते. पुरुषमंडळींनी घराबाहेर पडून आपल्या प्रेयसीच्या नावे प्रेमपत्र लिहून ते प्रेयसीला या लॉकरमध्ये ठेवावे लागत असे. 

मात्र या लव्हबर्डच्या बहरणाºया प्रेमात अडथळा निर्माण करण्याची जबाबदारी स्वयंघोषित बाबा स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा यांना दिली होती. यावरून या दोघांनी घरात असा काही राडा केला की, बिग बॉसला दोनदा टास्क मध्येच थांबवावा लागला. स्वामी ओमने तर घरातील बाथरूमच्या दरवाजाची तोडफोड केली. यामुळे संतापलेल्या बिग बॉसने स्वामी ओमला सर्वांसमक्ष खडेबोल सुनावत, ‘तुम्ही घरात हिंसा करू शकत नाही’ असा दम भरला. परंतु स्वामी ओमने त्यांच्या वर्तणुकीत कुठलाही सुधार आणला नसल्याने बिग बॉसने स्वामी ओमला कन्फेक्शन रूममध्ये बोलावून, ‘ही तुम्हाला शेवटची संधी आहे. जर तुम्ही पुन्हा हिंसा करण्याचा प्रयत्न केला तर तो तुमचा घरातील शेवटचा क्षण असेल’ अशी धमकीच दिली. 

परंतु नेहमीप्रमाणे स्वामी ओमने बिग बॉसच्या या धमकीला धुडकावून लावत घरातील सदस्यांशी हुज्जत घालणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे बिग बॉस स्वामी ओमवर काय कारवाई करतील, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 


Web Title: Big Boss gave a lot of threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.