बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेली हरियाणवी डान्सर सपना चौधरी आता घराघरात पोहचली आहे. बिग बॉसमुळेच सपनाचेही अनेक ...
सनी लिओनीपेक्षाही लोकप्रिय आहे ही बिग बॉसची स्पर्धक,जाणून घ्या तिच्या या खास गोष्टी
/>बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेली हरियाणवी डान्सर सपना चौधरी आता घराघरात पोहचली आहे. बिग बॉसमुळेच सपनाचेही अनेक चाहते बनले आहेत. आतापर्यंत हरियाणापूर्तीच मर्यादित असलेली सपनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. इतकेच नाहीतर तिची लोकप्रियता इतकी आहे की सनी लिओनीची जादूही कमी होईल. गेल्यावर्षी सपनाचा बिग बॉसची एक्स-कंटेस्टंट आणि पोर्न स्टार सनी लिओनीसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.हजारो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता. विशेष म्हणजे हा व्हिडीओला सनीमुळे नाहीतर सपना चौधरीच्या डान्समुळेच हा व्हिडीओ हिट ठरला होता. मात्र हा व्हिडीओ खरा नसन तो मॉर्फ केलेला व्हिडीओ असल्याचे समोर आले होते. एडिटिंग टेक्निकचा वापर करुन सनी आणि सपना यांना एका मंचावर दाखविण्यात आले होते. जेव्हा बिग बॉसने हिना खानला सपना चौधरीसह एका गाण्यावर डान्स करण्याचा टास्क दिला. तेव्हा दोघांनीही जोमात डान्स करायला सुरूवात केली.डान्स करण्यात सपना चौधरीचा कोणीही हात पकडु शकत नाही याचीच प्रचिती हा डान्स पाहताना आली.आपल्या अभिनयाने आणि सौदर्यांने रसिकांची लाडकी बनलेली अक्षरा म्हणजेच हिना खानची सपना पुढे जादू कमी झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी सपना चौधरीने तिचा सुपरहिट डान्स ''तेरी अखियों का ये काजल'' गाण्यावर ठेका धरत सा-यांनाच थिरकायला भाग पाडले.सगळे स्पर्धकही सपनाच्या डान्सवर फिदा झाल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळेच तेही हिना आणि सपनासह स्वतःला डान्स करण्यासाठी रोखु शकले नाहीत.सपना आणि हिनासह फुल ऑन डान्स करत सा-यांनीच एकच धम्माल उडवून दिल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉसकडून मिळालेल्या टास्कमध्ये हिना आणि सपना दोघांचा बेस्ट परफॉर्मन्स ठरला. सपनाचे डान्सचे चाहते आता बिग बॉसच्या घरातही आहेत.त्यामुळे ते सतत सपनाला डान्स करायला सांगत असतात.सपनाच्या सॉलिड बॉडी या पहिल्याच गाण्याने युट्युबला धुमाकूळ घातला होता.तिच्या पहिल्याच गाण्यामुळे ती फेमस झाली.आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की,एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते.
Web Title: Big boss competitor, which is more popular than Sunny Leone, learn about her special things