Big Boss 11: सहभागी होणा-या ‘कॉमन मॅन’ला मानधन नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 11:22 IST2017-08-02T04:59:50+5:302017-08-02T11:22:02+5:30

'बिग बॉस'च्या अकराव्या सीझनची रसिकांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'बिग बॉस'च्या आगामी सीझनचा होस्ट कोण सलमान की अक्षय ...

Big Boss 11: Do not overeat Common Man! | Big Boss 11: सहभागी होणा-या ‘कॉमन मॅन’ला मानधन नाही !

Big Boss 11: सहभागी होणा-या ‘कॉमन मॅन’ला मानधन नाही !

'
;बिग बॉस'च्या अकराव्या सीझनची रसिकांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'बिग बॉस'च्या आगामी सीझनचा होस्ट कोण सलमान की अक्षय इथपासून ते या सीझनमध्ये कोण कोण असेल अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 'बिग बॉस'च्या दहाव्या सीझनप्रमाणे यंदाच्या सीझनमध्येही बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटी आणि सर्वसामान्यांमधील काही व्यक्ती असणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 'सेलिब्रिटी' आणि 'कॉमन' जनतेमधील निवडक व्यक्ती एकत्र असणार आहेत.मात्र या सीझनमध्ये 'बिग बॉस'च्या घरात येणा-या सर्वसामान्य व्यक्तींना या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत असल्याबद्दल कोणतंही मानधन मिळणार नाही.मात्र यापैकी सोशल मीडियावर आपली छाप पाडणा-या आणि ओळखीचा चेहरा असणा-या सामान्यांच्या प्रतिनिधीला काही ना काही मानधन दिलं जाणार आहे. मात्र मानधन मिळो अथवा न मिळो कुण्याही सर्वसामान्य व्यक्तीला बिग बॉसच्या घरात एकदा तरी जावं असं नक्कीच वाटतं. कारण एकदा बिग बॉसच्या घरात गेलं आणि त्यातून निर्माण होणा-या वादांशी संबंध आला की आपुसकच वेगळी प्रसिद्धी मिळते. रातोरात त्या व्यक्तीचं नाव जगभरात पोहचतं. त्यामुळे मानधन मिळणार नसलं तरी प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला एकदा तरी बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा नक्कीच असते. यावर्षी आणखी एक नियम बनण्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून येणा-या व्यक्तीला एका कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी करावी लागणार आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्या व्यक्तीनं शोबाबत काहीही चुकीचं विधान केले तर त्या व्यक्तीला दहा लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.'बिग बॉस-११' ची घोषणा झाल्यापासून यांत सहभागी होणा-या सेलिब्रिटींच्या नावांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. निया शर्मापासून ते सना सईद यांची नावं यांत सामील आहेत.प्रसिद्ध अभिनेत्री अनेरी वजानी हिचं नावसुद्धा चांगलंच चर्चेत आहे. ती एका प्रसिद्ध मालिकेत काम करत असून सप्टेंबरमध्ये ही मालिका संपत आहे. मात्र अनेरीनं बिग बॉसच्या घरात सहभागी होत नसल्याचं सांगितलंय. बिग बॉसच्या घरात कोण जाणार याचा उलगडा अंतिम यादी समोर आल्यानंतरच होईल. मात्र सध्या सुरु असलेल्या चर्चा आणि बातम्यांवरुन  बिग बॉसचा आगामी सीझन चांगलाच रंगतदार आणि धमाकेदार ठरण्याची चिन्हं आहेत. 

Web Title: Big Boss 11: Do not overeat Common Man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.