​या बिग बॉस स्पर्धकाचा झाला अपघात, पोलिसांनी मदत करण्याऐवजी काढले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 18:06 IST2017-09-14T12:36:28+5:302017-09-14T18:06:28+5:30

बिग बॉस या कार्यक्रमामुळे आजवर अनेक सेलिब्रिटींना प्रसिद्धी मिळाली आहे. एवढेच नव्हे तर अनेक सामान्य लोकांना देखील या कार्यक्रमाने ...

This big accident happened with the accident of the boss, police instead removed the help | ​या बिग बॉस स्पर्धकाचा झाला अपघात, पोलिसांनी मदत करण्याऐवजी काढले फोटो

​या बिग बॉस स्पर्धकाचा झाला अपघात, पोलिसांनी मदत करण्याऐवजी काढले फोटो

ग बॉस या कार्यक्रमामुळे आजवर अनेक सेलिब्रिटींना प्रसिद्धी मिळाली आहे. एवढेच नव्हे तर अनेक सामान्य लोकांना देखील या कार्यक्रमाने सेलिब्रिटी बनवले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहाता या कार्यक्रमात भाग घ्यायची अनेकांची इच्छा असते. या कार्यक्रमात आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक पाहायला मिळतात. बिग बॉसच्या गेल्या सिझनपासून तर सामान्य लोकांनी देखील या कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मिळत आहे. सध्या या कार्यक्रमाच्या ११ व्या सिझनचे प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या प्रोमोमुळे प्रेक्षकांच्या मनात या सिझनविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. शेजारी-शेजारी अशी या नव्या सिझनची संकल्पना असल्याने या सिझनमध्ये प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 
बिग बॉस सात या सिझनमध्ये प्रेक्षकांना विवेक मिश्राला पाहायला मिळाले होते. विवेकची या कार्यक्रमात वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. तो एक प्रसिद्ध योगा गुरू आहे. या कार्यक्रमात असताना त्याची आणि कुशल टंडनची चांगलीच भांडणे झाली होती. त्यामुळे विवेक नावारूपाला आला होता. त्याच्या कारचा नुकताच अपघात झाला असून या अपघातात विवेक जखमी झाला आहे. पण विवेकचा अपघात झाल्यानंतर त्याला मदत करण्याऐवजी पोलिस त्याचे फोटो काढण्यातच व्यग्र होते असे त्याचे म्हणणे आहे. 
विवेक दिल्लीवरून लखनऊला त्याच्या घरी चालला होता. त्यावेळी रात्रीच्या वेळी त्याच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, त्याच्या मर्सिडीज गाडीचे तुकडे तुकडे झाले आहेत. विवेक आणि त्याचा ड्रायव्हर त्यावेळी गाडीत होते. विवेकच्या ड्रायव्हरला रात्रीची वेळ असल्याने पुढचा स्पीड ब्रेकर दिसला नाही आणि त्यामुळे त्याची गाडी पुढच्या गाडीवर जोरात आदळली. 
विवेकने टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, माझ्या गाडीचे तुकडे तुकडे झाले होते. मला देखील चांगलेच लागले होते. पण तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी मला मदत करण्याऐवजी ते माझे फोटो काढण्यातच व्यग्र होते. 
विवेक अपघातानंतर विमानाने दिल्लीला परतला आहे.

Also Read : बिग बॉसच्या ११व्या पर्वामध्ये झळकणार हे सेलिब्रिटी


Web Title: This big accident happened with the accident of the boss, police instead removed the help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.