​‘दम लगा के हैशा’च्या वळणावर ‘बढो बहू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 13:29 IST2016-09-09T07:59:42+5:302016-09-09T13:29:42+5:30

सिनेमांवर आधारित मालिका बनण्याचा नवा ट्रेंड आता छोट्या पडद्यावर सुरु होताना दिसतोय. सलमान खानच्या चोरी चोरी चुपके चुपके या ...

'Bhiha bahu' at the turn of 'Dham Ki Ke Hasha' | ​‘दम लगा के हैशा’च्या वळणावर ‘बढो बहू’

​‘दम लगा के हैशा’च्या वळणावर ‘बढो बहू’

नेमांवर आधारित मालिका बनण्याचा नवा ट्रेंड आता छोट्या पडद्यावर सुरु होताना दिसतोय. सलमान खानच्या चोरी चोरी चुपके चुपके या सिनेमाच्या कथेवर आधारित नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यातच आता आणखी एक मालिका सिनेमाच्या कथेवर आधारित असल्याचं बोललं जातंय. ही मालिका म्हणजे 'बढो बहू'. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका चर्चेत आहे ती रियालिटी शो विजेता प्रिन्स नरुलाच्या पदार्पणामुळे. मात्र आता प्रिन्सनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळं 'बढो बहू' ही मालिका 'दम लगा के हैशा' या सिनेमाच्या कथेसारखी असल्याच्या चर्चा रंगल्यात. दम लगा के हैशा या सिनेमाच्या पोस्टरमध्ये अभिनेता आयुषमान खुराणा यानं अभिनेत्री भूमी पेडणेकरला पाठीवर उचलून घेतलं होतं. अगदी त्याचप्रमाणे प्रिन्सनं या मालिकेच्या नायिकेला आपल्या पाठीवर उचलून घेतलंय. 'बढो बहू' ही मालिका लकी सिंह (प्रिन्स नरुला) आणि कोमल या दाम्पत्याच्या जीवनावर आधारित आहे. यांत त्यांचं लग्न मनाविरुद्ध झालंय. प्रिन्स यांत रेसलरच्या भूमिकेत दिसणार असून त्यासाठी बरीच मेहनत घेत असल्याचं त्यानं म्हटलंय.. शिवाय हरयाणवी भाषेवरही मेहनत घेत असल्याचं त्यानं सांगितलंय.   

Web Title: 'Bhiha bahu' at the turn of 'Dham Ki Ke Hasha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.