भैय्या को मिली दुल्हनिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 17:16 IST2016-09-24T11:46:55+5:302016-09-24T17:16:55+5:30
बडे भैय्या की दुल्हनिया ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. पण या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत ...
.jpg)
भैय्या को मिली दुल्हनिया
ब े भैय्या की दुल्हनिया ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. पण या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने ही मालिका बंद करण्याचा वाहिनीने निर्णय घेतला आहे. 7 ऑक्टोबरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जेनिफर विंगेट आणि कुशल टंडनची बेहद ही मालिका बडे भैय्या की दुल्हनिया या मालिकेची जागा घेणार आहे. बडे भैय्या की दुल्हनिया या मालिकेचा शेवट अभिषेक आणि मिरा यांच्या लग्नाने होणार असल्याचे कळतेय. या मालिकेचे चित्रीकरण ऑक्टोबरच्या सुरुवातीला संपणार आहे. या मालिकेमध्ये प्रियांशू झोरा आणि नमिता दुबे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.