भारती सिंहच्या प्रि-वेडींग फंक्शनला झाली सुरूवात,आसा पार पडणार हा लग्नसोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 12:32 IST2017-11-28T07:00:46+5:302017-11-28T12:32:51+5:30

टीव्ही इंडस्ट्री असो किंवा मग बॉलिवूड इंडस्ट्री सर्वत्रच बँड बाजा बारातचे सुरू ऐकायला मिळत आहेत.मात्र यात मोस्ट फेव्हरेट कॉमेडीयनच्या ...

Bharti Singh's pre-wedding function will start, this wedding will take place! | भारती सिंहच्या प्रि-वेडींग फंक्शनला झाली सुरूवात,आसा पार पडणार हा लग्नसोहळा!

भारती सिंहच्या प्रि-वेडींग फंक्शनला झाली सुरूवात,आसा पार पडणार हा लग्नसोहळा!

व्ही इंडस्ट्री असो किंवा मग बॉलिवूड इंडस्ट्री सर्वत्रच बँड बाजा बारातचे सुरू ऐकायला मिळत आहेत.मात्र यात मोस्ट फेव्हरेट कॉमेडीयनच्या लग्नाची चर्चा  गेल्या काही महिन्यापासून होत आहे. भारतीने तिच्या लग्नासाठी एक नाही दोन नाही तर तीन मुहुर्त काढले होते. त्यानुसार तिने 3 डिसेंबर ही तारिख लग्नासाठी निवडली आता तिच्या लग्नाचे प्रि-वेडींग फंक्शनलाही सुरूवात झाली आहे. आता येत्या 3 डिसेंबरला  कॉमेडियन भारती सिंग आणि लेखक हर्ष लिंबाचिया लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.लग्नापूर्वी होणा-या कार्यक्रमांमध्ये भारती आणि हर्ष यांचा रोमँटीक अंदाज पाहयला मिळत आहे.नुकतेच भारतीच्या घरी पंजाबी पद्धतीने बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लाल रंगाच्या लहेंग्यात भारती अतिशय सुंदर दिसत होती.विशेष म्हणजे खास भारतीसाठी डिझायनर नीता लुल्ला यांनी  हा लहेंगा डिझाइन केला  आहे.भारतीच्या बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाला तिच्या कुटुंबीयांसोबत टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी उपस्थिती लावली होती. 
 


यानंतर भारती डेस्टीनेश वेडिंग करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे लग्नाच्या मुहुर्ताप्रमाणे भारती लग्नासाठी कोणते लोकेशन निवडणार याकडेही सा-यांचे लक्ष लागले होते. अखेर ती प्रतिक्षा संपली आणि भारतीने लग्नासाठी गोव्याची निवड केली आहे.भारतीचे थीम वेडींग असणार आहे.त्यामुळे कोणत्या अंदाजत पाहुणे मंडळी या जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी हजेरी लावणार या गोष्टीपासून ते भारती आणि हर्ष दोघांची ड्रेसिंग कशी असणार या सगळ्या गोष्टींवर बारकाईने मेहनत घेण्यात आली आहे. भारतीच्या लग्नात प्रत्येक गोष्ट खास बनवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लग्नपत्रिकाही खास स्टाइलने डिझाईन करण्यात आली आहे. पत्रिकेच्या कव्हरवर शंख शिंपल्यांचे डिझाईन आहे. पत्रिकेच्या बॅकग्राऊंडला अॅक्वा-ब्लाईंड कलर आणि समुद्राचा फील देण्यात आला आहे.'दुल्हा हम ले जाऐंगे' असे मोठ्या अक्षरात लिहिले गेले आहे. ही पत्रिका एका पांढऱ्या लाकडाच्या छोट्या पेटीत लॉक करुन पेटी निळ्या रंगाच्या रिबीनने डिझाइन करण्यात आली आहे.




हे तर झालं लग्नातल्या खास अट्रॅक्शनविषयी आता हे दोघे हनीमुनसाठी कुठे जाणार याविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.हनीमूनसाठी ते कपल महिन्याभरासाठी युरोप ट्रीपला जाणार आहेत.



ग्रीस, स्पेन, बारसालोना, इटली या ठिकाणी हे आपले हनीमुन एन्जॉय करणार आहेत.

Web Title: Bharti Singh's pre-wedding function will start, this wedding will take place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.