​भारती सिंग नच बलियेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 14:57 IST2017-02-23T09:27:46+5:302017-02-23T14:57:46+5:30

भारती सिंग आणि तिचा प्रियकर हर्ष लिम्बाचिया नच बलियेमध्ये झळकणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण त्या दोघांनीही ...

Bharti Singh Nach Baliyin | ​भारती सिंग नच बलियेमध्ये

​भारती सिंग नच बलियेमध्ये

रती सिंग आणि तिचा प्रियकर हर्ष लिम्बाचिया नच बलियेमध्ये झळकणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण त्या दोघांनीही याबाबत मौन राखले होते. ते दोघे या कार्यक्रमात येणार असल्याचे आता त्यांनी कबूल केले आहे. या कार्यक्रमासाठी ते सध्या जोरदार तयारी करत आहेत. भारती सिंगने यापूर्वी झलक दिखला जा या कार्यक्रमात आपल्या नृत्यकौशल्याची झलक दाखवली होती आणि आता पुन्हा एकदा नृत्य सादर करण्याासाठी ते सज्ज झाले आहेत.
विशेष म्हणजे नच बलिये या कार्यक्रमात सॅव्हिओ, डॅनी आणि कुंजन हे भारती आणि हर्ष या जोडीचे कोरिओग्राफर असणार आहेत. सॅव्हिओ हा झलक दिखला जा कार्यक्रमातही भारतीचा कोरिओग्राफर होता. त्यामुळे या दोघांची खूपच चांगली मैत्री आहे. त्यामुळे आपल्या मित्रासोबत परत काम करायला मिळत असल्याचा भारतीला आनंद होत आहे. भारती आणि सॅव्हिओने या कार्यक्रमात खूपच चांगले परफॉर्मन्स सादर केले होते. त्यामुळे आता ते दोघे पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीचे परफॉर्मन्स देणार यात काही शंकाच नाही. 
भारती आणि हर्षने सॅव्हिओ, डॅनी आणि कुंजन या तिघांसोबत तालमी करायलादेखील सुरुवात केली आहे. झलकच्या चित्रपटाकरणाच्यावेळी भारती जास्तीत जास्त वेळ हा सॅव्हिओ आणि त्याच्या टीमसोबतच घालवत असे. नच बलियेममुळे त्यांच्या जुन्या आठवणींना आता उजाळा मिळाला आहे. याविषयी भारती सिंग सांगते, "सॅव्हिओ, डॅनी आणि कुंजन या तिघांसोबत पुन्हा काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ते सगळेच खूप टायलेंटेड आहेत. सॅव्हिओ मला नेहमीच आव्हानात्मक स्टेप्स करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. आम्ही झलक दिखला जाच्यावेळी खूप चांगला वेळ एकत्र घालवला आहे. नच बलियेमध्येदेखील आम्ही खूप चांगले काम करणार आहोत." 





Web Title: Bharti Singh Nach Baliyin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.