घाडगे & सून या मालिकेतील भाग्यश्री लिमयेला होते चिन्मय उद्गिरकरवर क्रश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:55 IST2017-09-18T10:25:40+5:302017-09-18T15:55:40+5:30
घाडगे & सून या मालिकेत सध्या प्रेक्षकांना भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उद्गिरकरची जोडी पाहायला मिळत आहे. ही जोडी प्रेक्षकांना ...
.jpg)
घाडगे & सून या मालिकेतील भाग्यश्री लिमयेला होते चिन्मय उद्गिरकरवर क्रश
घ डगे & सून या मालिकेत सध्या प्रेक्षकांना भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उद्गिरकरची जोडी पाहायला मिळत आहे. ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. चिन्मय उद्गिरकरने आजवर नांदा सौख्यभरे, स्वप्नाच्या पलीकडे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तो वाजलाच पाहिजे या चित्रपटात झळकला होता. तसेच सोनाली कुलकर्णीच्या लवकरच येणाऱ्या गुलाबजाम या चित्रपटात देखील चिन्मय महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. भाग्यश्रीची ही पहिलीच मालिका असून पहिल्याच मालिकेत चिन्मयसोबत काम करायला मिळत असल्याने सध्या ती खूप खूश आहे.
घाडगे & सून या मालिकेमधील भूमिकेमुळे ती आताच्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहे, असेच तिच्या चाहत्यांना वाटत आहे. तिच्या या भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया तिला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे ती सध्या खूपच खूश आहे आणि यासाठी तिने प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत.
आपल्या प्रत्येकालाच एक टोपण नाव असते. भाग्यश्रीचे टोपण नाव ऐकून तुम्हाला तिचे टोपण नाव नक्कीच आवडेल. भाग्यश्रीला सगळे प्रेमाने सोनू असे म्हणतात. तिला सेटवर, घरी तसेच तिचे सगळे मित्र मैत्रीण देखील याच नावाने हाक मारतात.
भाग्यश्रीला आजकालच्या इतर मुलींप्रमाणे सेल्फी काढायला देखील खूप आवडतो. ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिचे हे फोटो ती फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नेहमीच अपलोड करत असते.
भाग्यश्री ही मुळची सोलापूरची असून तिचे शिक्षण पुण्यामध्ये झाले आहे. कॉलेजमध्ये असताना भाग्यश्री आणि तिच्या एका मैत्रिणीचे चिन्मय उद्गिरकर क्रश होते, त्यांना तो खूपच आवडायचा. याबद्दल बोलताना भाग्यश्री सांगते, “जेव्हा मला घाडगे & सून ही मालिका मिळाली तेव्हा मी खूपच खुश झाले आणि माझ्यासोबत चिन्मय असणार आहे हे कळल्यावर तर मला खूपच आनंद झाला होता. मला चिन्मयसोबत काम करायला मिळाले असल्याने माझ्या मैत्रिणी मला चांगल्याच चिडवतात. चिन्मय हा अतिशय चांगला अभिनेता आहे. त्याचसोबत माझा एखादा सीन चांगला झाला तर तो लगेचच माझी प्रशंसा करतो”.
Also Read : म्हणून चिन्मय उदगीर म्हणतोय रिअल आणि रिल लाईफ 'सेम टू सेम'