'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्रीची नवी मालिका 'अबीर गुलाल', दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:48 AM2024-04-27T11:48:06+5:302024-04-27T11:48:36+5:30

'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्रीची 'अबीर गुलाल' मालिकेत एन्ट्री, म्हणते...

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave to play important role in colors marathi new marathi serial abir gulal | 'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्रीची नवी मालिका 'अबीर गुलाल', दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्रीची नवी मालिका 'अबीर गुलाल', दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'सुख कळले' मालिकेनंतर आता आणखी एक नवी मालिका कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. 'अबीर गुलाल' असं या मालिकेचं नाव असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेत कोणते कलाकार असणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. अबीर गुलालच्या निमित्ताने कोणते नवे चेहरे टीव्हीवर दिसणार यासाठी प्रेक्षकांच्या मनात आतुरता आहे. 

'अबीर गुलाल' मालिकेबाबत एक अपडेट समोर आली आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री सुरभी भावे हिची वर्णी लागली आहे. सुरभीने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 'अबीर गुलाल' मालिकेचा प्रोमो सुरभीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या स्टोरीला तिने "लवकरच एका नव्या भूमिकेत" असं कॅप्शन दिलं आहे. या मालिकेत सुरभी कोणती भूमिका साकारणार याबाबत तिने कोणतीही माहिती दिलेली नाही. पण, या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सुरभी सज्ज झाली आहे. 

सुरभीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्वामिनी' या मालिकेतील भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या ती राणी मी होणार मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 'भाग्य दिले तू मला', '३६ गुणी जोडी' या मालिकांमध्येही ती दिसली होती. अलिकडेच प्रद्रर्शित झालेल्या 'ही अनोखी गाठ' सिनेमांतही सुरभी झळकली होती. 

कलर्स मराठीच्या नव्या मालिकेतून एक हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांना पाहाया मिळणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये नुकत्याच जन्मलेल्या २ मुलींची रुग्णालयात अदलाबदल होत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. एक श्रीमंत घरातील मुलगी तर दुसरी गरीब घराण्यातील असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. "दोन अनोळखी मुलींची नशीबं एका रात्रीत बदलली...कोणी अन् का?" असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये म्हटलं गेलं आहे. 
 

Web Title: bhagya dile tu mala fame actress surabhi bhave to play important role in colors marathi new marathi serial abir gulal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.