'चला हवा येऊ द्या'चा बेस्ट परफॉर्मन्स मिस झालेत तुमचे, मग ही बातमी वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 16:09 IST2019-07-05T15:59:35+5:302019-07-05T16:09:43+5:30

आत्तापर्यंतच्या प्रवासात 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला.

Best performance of chala hawa yeu dya will re-telecast | 'चला हवा येऊ द्या'चा बेस्ट परफॉर्मन्स मिस झालेत तुमचे, मग ही बातमी वाचाच

'चला हवा येऊ द्या'चा बेस्ट परफॉर्मन्स मिस झालेत तुमचे, मग ही बातमी वाचाच

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात नावीन्य म्हणून चला हवा येऊ द्या चे ‘होउ दे व्हायरल’ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आणि या यशस्वी पर्वा नंतर 'चला हवा येऊ द्या'च विशेष सिलेब्रिटी पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं. सध्या वर्ल्ड कप सुरु असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये क्रिकेटची हवा आहे. या विशेष पर्वात विनोदाचे चौकार, षट्कार आणि विनोदाची आतिषबाजी असते.

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांचा लाडका आहे यात शंकाच नाही. म्हणूनच थुकरट वाडीत बॉलिवूडचे कलाकार देखील सज्ज झाले. येत्या रविवारी प्रेक्षकांना हास्याचा एक्सट्रा डोस मिळेल कारण चला 'हवा येऊ द्या'चा संडे धमाका प्रसारित होणार आहे. रविवार ७ जुलै रात्री ७ ते १० वाजता हास्याचा धमाका होणार आहे. चला हवा येऊ द्या मधील काही बेस्ट परफॉर्मन्स प्रेक्षक पुन्हा एकदा पाहू शकतील.

Web Title: Best performance of chala hawa yeu dya will re-telecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.