"बाई आहे म्हणून मला...", 'मुरांबा'मधील पार्वती मुकादम 'बाईपणा'वर स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:13 IST2025-06-23T12:12:33+5:302025-06-23T12:13:08+5:30
Pratima Kulkarni: 'मुरांबा'मधील पार्वती मुकादम फेम दिग्दर्शिका आणि अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत बाईपणावर भाष्य केले आहे.

"बाई आहे म्हणून मला...", 'मुरांबा'मधील पार्वती मुकादम 'बाईपणा'वर स्पष्टच बोलल्या
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे मुरांबा (Muramba Serial). या मालिकेतील सर्वच पात्र घराघरात पोहचले आहेत. या मालिकेत पार्वती मुकादम उर्फ आई आजीची भूमिका दिग्दर्शिका आणि अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी (Pratima Kulkarni) यांनी साकारली आहे. या मालिकेतून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान आता एका मुलाखतीत त्यांनी बाईपणावर भाष्य केले आहे.
प्रतिमा कुलकर्णी यांनी नुकतेच आरपार ऑनलाइन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आणि यावेळी त्यांनी करिअर, खासगी आयुष्यावर भाष्य केले. तसेच या मुलाखतीत त्यांनी बाई म्हणून आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, ''आपण एकटं नाही राहू शकत हा आपल्याला कोणीतरी लागेल हेही कधी केलं नाही. एकटं राहायचंही ठरवलं नाही आणि पण आपल्याला एकटं राहता येणार नाही, हेही कधी ठरवलं नाही. मला हे कधी जाणवलंच नाही म्हणजे आता बरेच जण विचारतात की मग तू बाई म्हणून दिग्दर्शक म्हणून त्यांना मला ही जाणीव जेव्हा आत्मकथा आलं आणि जेव्हा माझी कोलकत्त्याच्या दूरदर्शनसाठी मुलाखत घेतली की तू बाई म्हणून तुला असं कसं तेव्हा मी म्हटलं तुम्ही म्हणताय तेव्हा मला जाणवतंय की मी बाई आहे. मी करत असताना मला हे नव्हतं कधी मनात की मी बाई आहे. हा मला मी दिग्दर्शक आहे का हा प्रश्न पडला होता. पण बाई आहे म्हणून मला अमूक येणार नाही असं मला कधीच वाटलं नाही आणि ते मला तसंही वाटत नाही. ''
''आपण एकटे आहोत तर मग काय?''
प्रतिमा कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, ''आपल्याला जर ती खूप जाणीव नसेल की आपण बाई आहोत. आपण एकटे आहोत तर मग काय तर आपल्याला काही फरक नाही पडत. माझ्याकडे चांगली आसपासची सपोर्ट सिस्टम खूप चांगली आहे. सगळीकडे होती. म्हणजे आता मी २० वर्ष एका घरात राहते. त्याच्याआधी मी १० वर्ष दुसरीकडे राहत होते. तेव्हा पण सगळे चांगले होते. ''