'बाळूमामा' फेम अभिनेता सुमीत पुसावळे अडकला विवाहबंधनात, लग्नाचा फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 13:06 IST2022-12-14T13:05:40+5:302022-12-14T13:06:11+5:30
बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे (Sumeet Pusavale)चा सांगोला येथे लग्नसोहळा पार पडला.

'बाळूमामा' फेम अभिनेता सुमीत पुसावळे अडकला विवाहबंधनात, लग्नाचा फोटो आला समोर
सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक सेलिब्रिटी लग्नबेडीत अडकत आहेत. अक्षया देवधर व हार्दिक जोशीने लग्नगाठ बांधली. त्याच दिवशी अभिनेता आशय कुलकर्णीहीचा विवाह संपन्न झाला. आता आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. हा अभिनेता म्हणजे बाळूमामाच्या नावाने चांगभलं’मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे (Sumeet Pusavale). आज त्याचा विवाह पार पडला आहे. काल त्याचा साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे.
सुमीत पुसावळे याने मोनिकासोबत सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे. सांगोला येथे विवाहसोहळा अगदी थाटमाट पार पडला असून या लग्नाला त्याच्या सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती.
तर मराठी सेलिब्रिटींनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. काल त्याचा साखरपुडा समारंभ आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
अभिनेता सुमीत पुसावळे याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लागिर झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.