‘बालिका वधू’ मालिनी कपूर झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 02:35 PM2017-12-09T14:35:39+5:302017-12-09T20:05:46+5:30

मालिनी कपूर हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, कपूर आणि शर्मा परिवारात सध्या आनंदाचे वातावरण आहे. वाचा सविस्तर!

'Balika Vadhu' Malini Kapoor was born, gave birth to a beautiful son! | ‘बालिका वधू’ मालिनी कपूर झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म!

‘बालिका वधू’ मालिनी कपूर झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म!

googlenewsNext
व्ही अभिनेत्री आणि ‘बालिका वधू’मध्ये बघावयास मिळालेली मालिनी कपूर ही आता खºयाखुºया आयुष्यात आई बनली आहे. होय, मालिनीने गेल्या ५ डिसेंबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने मालिनी, पती अजय शर्मा आणि कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. यावेळी मालिनीने सांगितले की, आम्ही दोघे खूपच उत्साहित आहोत. आमच्या घरात नवा पाहुणा आल्याने आमचा परिवार आता पूर्ण झाला आहे. माझ्यासाठी हा खूप आनंददायी क्षण आहे. मी हा आनंद शब्दात सांगू शकत नाही. मला असे वाटते की, आई होणे हा एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे. 

मालिनीने ‘यारो का टशन’, ‘बालिका वधू’, ‘साथिया’, ‘कुमकुम’, ‘देखो मगर प्यार से’ आणि ‘सिंदूर’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. आई झाल्यामुळे मालिनीने आता त्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये स्थान मिळविले, ज्या नुकत्याच आई झाल्या आहेत. यामध्ये ‘दीया और बाती हम’मधील दीपिका सिंग, श्वेता तिवारी, तीजे सिंधू, दिशा वकानी आणि सौम्या सेठ या अभिनेत्रींची नावे आहेत. आता यामध्ये मालिनी कपूर हे नावदेखील जोडले गेले आहे. काही दिवसांपूर्वीच मालिनीने तिचे काही फोटोज् शेअर केले होते. त्यामध्ये ती गर्भवती असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. 
 

२०१४ मध्ये एका समारंभात मालिनीने अजय शर्मासोबत विवाह केला होता. अजयदेखील एक अभिनेता असून, मालिनीशी त्याची भेट ‘लव यू जिंदगी’च्या सेटवर झाली होती. काही दिवसांपूर्वीच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अभिनेत्री दिशा वकानी आई बनल्याची बातमी समोर आली होती. दिशाने एका चिमुकलीला जन्म दिला. दरम्यान, मुलाच्या आगमनामुळे कपूर आणि शर्मा परिवारात आनंदाचे वातावरण आहे. 

Web Title: 'Balika Vadhu' Malini Kapoor was born, gave birth to a beautiful son!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.