ये रिश्ता है प्यार का या मालिकेचे गाणे गाणार हा प्रसिद्ध बॉलिवूड गायक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 06:27 PM2019-02-27T18:27:50+5:302019-02-27T18:29:10+5:30

‘ये रिश्ता है प्यार का’ या मालिकेच्या कथानकाप्रमाणे या मालिकेचे शीर्षकगीत देखील खूप वेगळे आहे. या मालिकेचे शीर्षकगीत रॅपच्या शैलीत असणार आहे.

Badshah raps for the title track of StarPlus’ Yeh Rishtey Hain Pyaar Ke | ये रिश्ता है प्यार का या मालिकेचे गाणे गाणार हा प्रसिद्ध बॉलिवूड गायक

ये रिश्ता है प्यार का या मालिकेचे गाणे गाणार हा प्रसिद्ध बॉलिवूड गायक

googlenewsNext
ठळक मुद्देया मालिकेचे शीर्षकगीत रॅपच्या शैलीत असून ते रॅपचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बादशहाने गायले आहे.


‘स्टार प्लस’वर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. याच मालिकेच्या कथानकावर आधारित एक नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

‘ये रिश्ता है प्यार का’ असे या नव्या मालिकेचे नाव असून या मालिकेत शाहीर शेख आणि रिया शर्मा हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. शाहीर शेखने कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत काम केले होते. या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती तर रिया शर्मा तू सूरज, मैं साँझ पियाजी या मालिकेत झळकली होती. या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग असल्याने त्यांचे फॅन्स या मालिकेची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

‘ये रिश्ता है प्यार का’ या मालिकेच्या कथानकाप्रमाणे या मालिकेचे शीर्षकगीत देखील खूप वेगळे आहे. या मालिकेचे शीर्षकगीत रॅपच्या शैलीत असून ते रॅपचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बादशहाने गायले आहे. ‘ये रिश्ता है प्यार का’ या मालिकेची टीम सध्या या मालिकेच्या प्रत्येक गोष्टीवर अतिशय मेहनत घेत आहे. या मालिकेच्या निर्मितीत कोणतीही कमतरता शिल्लक राहू नये यासाठी या मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. त्यामुळेच त्यांनी या मालिकेचं शीर्षकगीत बॉलिवूडचा आघाडीचा रॅप गायक बादशहाकडून गावून घेतले आहे. रॅम्पर बादशाहने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यामुळे या मालिकेचे गाणे देखील अतिशय चांगले असणार यात काहीच शंका नाही.

‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ता है प्यार का’ ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेची कथा पुढे नेणार आहे. त्यामुळे ही मालिका देखील तितकीच लोकप्रिय होईल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.

‘ये रिश्ता है प्यार का’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्लस’वर सुरू होणार आहे. 

Web Title: Badshah raps for the title track of StarPlus’ Yeh Rishtey Hain Pyaar Ke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.