बिन कुछ कहे या मालिकेतील अर्चना मित्तलची रिअल आणि रिल लाइफ सारखीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 11:25 IST2017-02-22T05:55:16+5:302017-02-22T11:25:16+5:30
बिन कुछ कहे या मालिकेत अर्चना मित्तल एक छोटेसे रेस्टॉरंट चालवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण खऱ्या आयुष्यातही ...

बिन कुछ कहे या मालिकेतील अर्चना मित्तलची रिअल आणि रिल लाइफ सारखीच
ref="http://cnxmasti.lokmat.com/television/news/bin-kuch-kahe-team-visited-ajmer-sharif-dargah/17981">बिन कुछ कहे या मालिकेत अर्चना मित्तल एक छोटेसे रेस्टॉरंट चालवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण खऱ्या आयुष्यातही तिचे स्वतःचे रेस्टाँरंट असल्याने तिची रिल आणि रिअल लाइफ आता सारखीच झाली आहे.
अनेक कलाकार अभिनय करण्यासोबत आणखी काही व्यवसायदेखील करत असतात. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांचे रेस्टॉरंट किंवा बुटिक आहेत. बिन कुछ कहे या मालिकेतील अर्चना मित्तलचा रिअल आणि रिल लाइफमध्ये एकच व्यवसाय असल्याने ती सध्या खूपच खूश आहे.
बिन कुछ कहे या मालिकेत मीराच्या आईची भूमिका साकारणारी मिसेस कौहली म्हणजेच अर्चना मित्तलचे जयपूरमध्ये कोहली कॅन्टिन नावाचे एक रेस्टॉरंट असून ती ते तिच्या मुलींच्या मदतीने चालवते असे दाखवण्यात आले आहे. खऱ्या आयुष्यातदेखील अर्चनाचे बंगळुरूमध्ये एक कॅफे आहे. ती कॅफे आणि अभिनय या दोन्ही गोष्टी खूप चांगल्याप्रकारे सांभाळत आहे. याविषयी अर्चना सांगते, "बिन कुछ कहे या मालिकेत मी आपल्या मुलींच्या मदतीने रेस्टॉरंट चालवणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे तर खऱ्या आयुष्यातही मी कॅन्टिन व्यवसायात कार्यरत असून बंगळुरूमध्ये माझे स्वतःचे एक कॅफे आहे. मालिकेतील माझी भूमिका आणि खऱ्या आयुष्यातील माझी भूमिका ही सारखीच असल्याने मी अभिनय करते असे मला वाटतच नाही. अभिनय करणे मी एन्जॉय करते आणि त्यातही माझ्या अभिनयाद्वारे माझे रोजचेच आयुष्य मी पड्यावर रेखाटत असल्याने त्याचा मला अधिक आनंद होत आहे."
बिन कुछ कहे या मालिकेत एका पंजाबी कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या तिन्ही मुलींचा सांभाळ एक स्त्री करते. या तिन्ही मुलींचा स्वभाव खूपच वेगळा आहे. पण या तिघींकडून त्यांच्या आईला खूप अपेक्षा आहेत. त्यातील सर्वात लहान मुलगी मायरा ही सगळ्यांची खूप लाडकी आहे. खऱ्या प्रेमाचा शोध घेत असलेल्या मायराची कथा मालिकेत दाखवली जात आहे.