बबिता फोगटचा बढो बहुच्या सेटवर जल्लोषाच वाढदिवस साजरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 14:05 IST2017-11-28T08:35:39+5:302017-11-28T14:05:39+5:30

कुस्तीतील चॅम्पियन बबिता फोगट सध्या टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका 'बढो बहू'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून आखाड्यात बढो अर्थात रिताशा राठोडबरोबर कुस्ती ...

Babita Fogat celebrates birthday celebration of big set! | बबिता फोगटचा बढो बहुच्या सेटवर जल्लोषाच वाढदिवस साजरा!

बबिता फोगटचा बढो बहुच्या सेटवर जल्लोषाच वाढदिवस साजरा!

स्तीतील चॅम्पियन बबिता फोगट सध्या टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका 'बढो बहू'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून आखाड्यात बढो अर्थात रिताशा राठोडबरोबर कुस्ती लढणार होती. योगायोगाने, बबिताचा वाढदिवस तिच्या या शूटिंगच्या तारखांमध्येच येत होता आणि बांधिलकी जपणार्‍या या कुस्तीवीरने काम करण्याचाच निर्णय घेतला. यातील सध्याच्या कुस्तीच्या पटकथेमुळे संपूर्ण दिवसात अगदी शूटिंग संपल्यानंतरही बबिताला अजिबात वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळ मिळाला नाही. व्यस्त कामातूनही, मालिकेच्या कलाकार आणि क्रूने बढो स्टाईलमध्ये तिचा वाढदिवस विशेष साजरा करण्याला प्राधान्य दिले. शूट संपल्यानंतर, तिचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी केक, पुष्पगुच्छ, खाणे आणि गाणे यांच्या सरप्राईजसह प्रत्येकाने सहभाग घेतला. सहकलाकारांकडून मिळालेल्या या वागणुकीमुळे बबिताला खूपच आनंद झाला आणि नंतर त्यांच्याबरोबर तीही या आनंदात सहभागी झाली.याबद्दल सांगताना, रिताशा राठोड ऊर्थ बढो म्हणाली, “ऑलिम्पियन खेळाडूसाठी हॅप्पी बर्थडे गाणे म्हणण्याचा योग काही नेहमी येत नाही. सेटवरील प्रत्येकासाठी हा दिवस अगदी खरंच खास होता. बबिताबरोबर काम करणे हे निखळ आनंद मिळण्याजोगे आहे. तिने तरूण वयात खूप यश मिळवले आहे आणि मला आशा आहे की, आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी अधिकाधिक तरूणींना ती आदर्श वाटत राहील.”



पतीला आनंदी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा आणि अडचणीतून जाणारी 100 किलो वजनाची बहू, बढो हिला आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन आखाड्यात उतरावे लागणार आहे. यामध्ये तिला प्रतिस्पर्धी म्हणून 3 वेळा कॉमन वेल्थ चॅम्पियन असलेल्या बबिता फोगटला सामोरे जावे लागणार आहे.'बढो बहू' मालिकेत स्वत:च्याच भूमिकेतून बबिता टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करेल.हे आव्हान स्वीकारून आपला नवरा लाखाची (प्रिन्स नरूला) कारकीर्द एका अर्थाने पणाला लावली आहे. या वेगळ्या दंगलचे परिणाम काय होतील? ही दंगल बढो हरल्यास लाखा आणि तिचे सासरे – रघुवीर सिंग अहलावत या दोघांनाही कुस्ती सोडून द्यावी लागेल. एका बाजूला बढो संपूर्ण निष्ठेने प्रशिक्षण घेताना दिसेल. सगळे बढोला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळेल, मात्र कमला आणि पिंकी नक्कीच बढोच्या मार्गात अडचणी निर्माण करतील.पण बढो तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा देण्यासाठी तयार आहे. ही अद्भूत कुस्ती पाहण्याचीवेगळीच मजा असेल.पदार्पणाविषयी बबिता म्हणाली,“स्वतःच्या भूमिकेत बढो बहूमधून टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. खरेच, नेहमी काहीतरी वेगळे देणार्‍या अशा मालिकेशी जोडले जाणे याचा आनंद आहे. मला ही संकल्पना तसेच बहूचे सामर्थ्य आवडले. तिचे कौशल्य सर्वज्ञात आहे आणि तिच्या सासर्‍याकडून तिला संपूर्ण पाठिंबा आहे. हे खूपच पुरोगामी असून याला पाठिंबा द्यायला नक्कीच मला आवडेल. 

Web Title: Babita Fogat celebrates birthday celebration of big set!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.