अविनाश रेखीची बॉलिवूड स्वप्नेः घेतले वेगळे रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 12:54 IST2018-02-02T07:24:38+5:302018-02-02T12:54:38+5:30

स्टार प्लसवरील तू सूरज मैं सांझ पियाजीने नुकतेच आपले बँकॉकमधील आऊटडोअर चित्रीकरण पूर्ण केले,  ज्यात शो ने नाट्‌यमय वळण ...

Avinash Rakhi Bollywood Dream: Different Forms Taken | अविनाश रेखीची बॉलिवूड स्वप्नेः घेतले वेगळे रूप

अविनाश रेखीची बॉलिवूड स्वप्नेः घेतले वेगळे रूप

टार प्लसवरील तू सूरज मैं सांझ पियाजीने नुकतेच आपले बँकॉकमधील आऊटडोअर चित्रीकरण पूर्ण केले,  ज्यात शो ने नाट्‌यमय वळण घेतले.  अभिनेता अविनाश रेखी ह्या शोमध्ये उमाशंकर ही भूमिका साकारत असून टीव्हीवर तो एका वेगळ्‌याच भूमिकेत दिसून येईल. तो सरदारचे रूप घेऊन कनक रिया शर्मा सोबत बँकॉकमध्ये मासी सा सादिया सिद्दिकीचे खरे रूप उघडे पाडेल. त्याला आपल्या ह्या लूकसाठी खूप काम करावे लागले. आपल्या स्क्रीन  उपस्थितीबाबत तो खूप सजग असून सरदार लूकसाठी त्याने ३ महिने खरी दाढी आणि केस वाढवले आणि प्रोटीन डाएट घेतला. 

अविनाश म्हणाला, “मला माझा नवीन लूक खूप आवडला आहे. मी शीख परिवारातील असून माझ्या संस्कृतीला स्क्रीनवर मांडताना मला अभिमान वाटत आहे. मी पगडी घातल्याला खूप काळ लोटून गेला होता. मला माझ्या शरीरयष्टीवरही काम करावे लागले कारण मी पहिल्यापासूनच बारीक आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी मला देशी रूपात पाहिले पण आता उमाचे हे वेगळे रूप पाहायला मिळेल.”

सध्या तू सूरज मैं सांझ पियाजी या मालिकेत उमाची मावशी या दोघांना वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहे. पण फरीदा जलाल उमा आणि कनक यांच्यात समेट घडवून आणताना दिसणार आहेत. फरीदा यांची या मालिकेतील भूमिका ही काहीच भागांची आहे. फरीदा यांची ही भूमिका छोटी असली तरी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे. वेद आणि पायल यांच्या लग्नाचा ट्रॅक हा तू सूरज मैं सांझ पियाजी या मालिकेतील टर्निंग पॉईन्ट असणार असून त्यानंतर मालिकेत अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.

Web Title: Avinash Rakhi Bollywood Dream: Different Forms Taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.