'बालिका वधू'च्या आनंदीची सोशल मीडियावर चर्चा, हे फोटो आहेत कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 11:28 AM2022-07-23T11:28:17+5:302022-07-23T11:32:32+5:30

अविका गोर स्टाईल दिवा बनली आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सध्या अविका तिच्या लव्हलाईफबद्दल ही चर्चेत असते. मिलिंद चांदवानीसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.

Avika Gor breathtaking bikini looks from Maldives | 'बालिका वधू'च्या आनंदीची सोशल मीडियावर चर्चा, हे फोटो आहेत कारणीभूत

'बालिका वधू'च्या आनंदीची सोशल मीडियावर चर्चा, हे फोटो आहेत कारणीभूत

googlenewsNext

'बालिका वधू' मधून आनंदी बनत घराघरात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री अविका गौरने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अविकाने अगदी लहान वयात तिच्या अभिनयाला सुरुवात केली होती. तिने आधी लहानग्या आनंदीची भूमिका साकारत सगळ्यांची पसंती मिळवली. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली. यामध्ये अविकानं रोलीची भूमिका निभावली होती.याशिवाय, तिने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे.

आता इंटरनेटवरसुद्धा अविकाने आपला ठसा उमटवला आहे. अविका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंना चाहते तितकीच पसंती देत असतात.  दररोज तिचे हटके फोटो खूप व्हायरल होतात. अविकाला जबरदस्त फॅशन सेन्स आहे. तिने नुकतेच मालदीव्ह व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

 

अविका गोर स्टाईल दिवा बनली आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सध्या अविका तिच्या लव्हलाईफबद्दल ही चर्चेत असते. मिलिंद चांदवानीसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये अविका गौरने तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी याची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. अधून मधून दोघेही त्यांचे फोटो शेअर करत आपले प्रेम जाहीर करत असतात.दोघेही सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. काही दिवसांपूर्वी, अविकाने एख खास फोटो शेअर केला होता. सॅटिन मल्टिकलर ड्रेसमध्ये ती दिसली होती आणि तो फोटोसुद्धा बीचवर काढला होता.

कजाकिस्तानात अविका खूप लोकप्रिय आहे. `बालिकावधू` या कार्यक्रमाच्या भागांचं प्रसारण तिथे सुरु असतं सुरू आहे. अविकाची वाढती लोकप्रियता पाहून तिथल्या स्थानिक ब्रॉडकास्टर्स अविकाच्या `ससुराल सिमर का` या दुसऱ्या डेली सोपचे अधिकार विकत घेतले आहेत. 

Web Title: Avika Gor breathtaking bikini looks from Maldives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.