अवधूत गुप्तेने घेतली महागडी MG Cyberster, लक्झरियस कारची किंमत ऐकून झोपच उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:06 IST2025-09-26T11:05:17+5:302025-09-26T11:06:39+5:30
अवधूतने MG Cyberster ही महागडी कार घरी आणली आहे. नवरात्रीच्या मुहुर्तावर अवधूतने नव्या कारची खरेदी केली आहे.

अवधूत गुप्तेने घेतली महागडी MG Cyberster, लक्झरियस कारची किंमत ऐकून झोपच उडेल
अवधूत गुप्ते हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक आहे. त्याची अनेक गाणी हिट झाली आहेत. तर प्रेक्षकांना अवधूत त्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध करतो. सुपरहिट सिनेमांतील गाण्यांना आवाज देण्यासोबतच अवधूतने काही अल्बम साँग आणि राजकीय पक्षाची गाणीही त्याने गायली आहेत. अवधूत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नव्या प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो. नुकतंच अवधुतने नवी कोरी लक्झरियस कार खरेदी केली आहे.
अवधूतने MG Cyberster ही महागडी कार घरी आणली आहे. नवरात्रीच्या मुहुर्तावर अवधूतने नव्या कारची खरेदी केली आहे. कुटुंबीयांसह अवधुत ही कार घेण्यासाठी गेला होता. अगदी मराठमोळ्या पद्धतीत अवधूतचं शोरुममध्ये स्वागत करण्यात आलं. याचा व्हिडीओ समोर आला आहे. अवधूत गुप्तेने घेतलेली ही कार खूपच खास आहे. या कारची किंमतही लाखोंच्या घरात आहे.
MG मोटर कंपनीची भारतातील MG Cyberster ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. या कारची किंमत सुमारे ७५ ते ७९ लाख इतकी आहे. या गाडीचे रुफ पूर्णपणे उघडते. तर दरवाजेही खास पद्धतीने डिझाइन केले गेले आहेत. त्यामुळे MG Cyberster ही गाडी असणं हे अनेकांचं स्वप्न असतं.