​हा प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 17:34 IST2016-11-02T17:34:27+5:302016-11-02T17:34:27+5:30

द व्हॉईस इंडिया किड्स या कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचे विजेतेपद ...

This audience's favorite program will soon see the audience again | ​हा प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार

​हा प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार

व्हॉईस इंडिया किड्स या कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचे विजेतेपद निष्ठा शर्माने पटकावले. या कार्यक्रमातील सगळ्याच चिमुकल्यांचा आवाज प्रेक्षकांना खूपच भावला होता. या कार्यक्रमाच्या आधी द व्हॉईस इंडियाचे पहिले पर्व आपल्याला पाहायला मिळाले होते. आता या कार्यक्रमाच्या यशानंतर द व्हॉईस इंडियाचे पुढील पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. द व्हॉईस इंडिया या कार्यक्रमाचे परीक्षण शान, नीती आणि शेखर यांनी केले होते. या तिन्ही गायकांनी आपापल्या टीमला दिलेले मागर्दर्शन त्यांच्यासाठी खूप मोलाचे ठरले होते. निष्ठाने या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळाल्यानंतर तिच्या मेन्टर नीती यांचे आभारदेखील मानले होते. द व्हॉईस इंडिया किड्सप्रमाणेच पुढील काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या द व्हॉईस इंडियामध्येही परीक्षक मार्गदर्शकाच्या भूमिकेत झळकताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 
द व्हॉईस इंडियाच्या या आधीच्या सिझनचे परीक्षण हिमेश रेशमिया, मिका सिंग, शान सुनिती चौहान यांनी केले होते. आताच्या सिझनला आधीच्या सिझनमधील केवळ शान परीक्षकाच्या खुर्चीत बसणार असून नवीन परीक्षक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामध्ये आजच्या घडीच्या अनेक प्रसिद्ध गायक आणि संगीतकारांचा समावेश असणार आहे. बेनी डायल, नीती मोहन आणि सलीम मर्चंट हे या सीझनचे परीक्षण करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच करण ठक्करच्याऐवजी सुगंधा मिश्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: This audience's favorite program will soon see the audience again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.