या अभिनेत्याने खास अंदाजात दिल्या तेजश्री प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भूतकाळ विसरण्याचा दिला सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 17:57 IST2021-06-02T17:55:39+5:302021-06-02T17:57:21+5:30

तेजश्री प्रधानचा आज वाढदिवस असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला अनेकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

ashutosh patki wishes with special message to tejashree pradhan | या अभिनेत्याने खास अंदाजात दिल्या तेजश्री प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भूतकाळ विसरण्याचा दिला सल्ला

या अभिनेत्याने खास अंदाजात दिल्या तेजश्री प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भूतकाळ विसरण्याचा दिला सल्ला

ठळक मुद्देतेजश्रीने नुकतेच अग्गंबाई सासूबाई या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिचा सहकलाकार आशुतोष पत्कीने खास अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजश्री प्रधानचा आज वाढदिवस असून तिने खूपच कमी काळात मराठी इंडस्ट्रीत तिची एक ओळख निर्माण केली आहे. तिला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यावर तिचे फॅन्स फिदा आहेत.

तेजश्रीने नुकतेच अग्गंबाई सासूबाई या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिचा सहकलाकार आशुतोष पत्कीने खास अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, माझी प्रिय मैत्रीण तू माझ्यासाठी खूपच खास आहेस... मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि नेहमीच माझ्या पाठिशी उभी राहिल्याबद्दल धन्यवाद.... मी तुला तुझ्या वाढदिवसाला दोन टिप्स देऊ इच्छितो पहिली म्हणजे तुझा भूतकाळ विसरून जा... कारण तू तो बदलू शकत नाही आणि दुसरी म्हणजे वर्तमानकाळ देखील विसरून जा... कारण तुझ्यासारखी कोणीच नाहीये...

तेजश्री प्रधानने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध सिनेमातील तिच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. इतकंच नव्हे तर ती महाराष्ट्राची लाडकी आणि आदर्श सून बनली. या मालिकेआधी तिने झेंडा या चित्रपटात काम केले होते. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली.

तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेनंतर चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला होता. अग्गंबाई सासूबाई या नुकत्याच संपलेल्या तिच्या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Web Title: ashutosh patki wishes with special message to tejashree pradhan