'बिग बॉस १९'साठी अशनूर कौरनं किती मानधन घेतलं? आकडा वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:43 IST2025-12-01T18:42:23+5:302025-12-01T18:43:05+5:30

शोमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये तिचे नाव आहे.

Ashnoor Kaur Bigg Boss 19 Earnings Charged Huge Fee Per Week Made Lakhs In 14 Weeks | 'बिग बॉस १९'साठी अशनूर कौरनं किती मानधन घेतलं? आकडा वाचून थक्क व्हाल!

'बिग बॉस १९'साठी अशनूर कौरनं किती मानधन घेतलं? आकडा वाचून थक्क व्हाल!

'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या रविवारी म्हणजेच ७ डिसेंबर रोजी शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस असतानाच अशनूर कौर ही बेघर झाली. 'तिकीट टू फिनाले' टास्कदरम्यान तिने तान्या मित्तला दुखापत करत 'बिग बॉस'चा महत्त्वाचा नियम मोडला. यामुळे सलमान खानने तिला शनिवारच्या 'वीकेंड का वार'मध्ये एलिमिनेट केले. अशनूर कौर शोमधून बाहेर पडली असली तरी, तिने केलेल्या कमाईचा आकडा ऐकून चाहत्यांना आश्चर्य वाटेल. शोमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये तिचे नाव आहे.

अशनूर ही 'जनसत्ता'च्या वृत्तानुसार, 'बिग बॉस १९' साठी दर आठवड्याला सहा लाख रुपये इतकं मानधन घ्यायची. तिने शोमध्ये एकूण १४ आठवडे प्रवास केला. त्यानुसार, अशनूरने या १४ आठवड्यांत जवळपास ८४ लाख रुपये  इतकी कमाई केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अशनूरने कमावलेली ही ८४ लाखांची रक्कम 'बिग बॉस'च्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे, बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नसली तरी, अशनूर कौरने यंदाच्या सीझनमध्ये आर्थिकदृष्ट्या मोठी कमाई केली आहे.


वयाच्या ५व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण

अशनूर कौर ही फक्त २१ वर्षांची आहे. तिने वयाच्या ५व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिने २००९ साली 'झाँसी की रानी' ही पहिली मालिका केली. यानंतर ती 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिने छोट्या नायराची भूमिका केली होती. याशिवाय ती 'शोभा सोमनाथ की', 'देवों के देव महादेव', 'साथ निभाना साथिया', 'सियासत' आणि 'पृथ्वी वल्लभ' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. सध्या ती 'सुमन इंदौरी'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसतेय. तर तिच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 'संजू', 'मनमर्जिया'मध्येही काम केले आहे.
 

Web Title : अशनूर कौर ने 'बिग बॉस 19' के लिए कितनी फीस ली: आंकड़ा जानकर चौंक जाएंगे!

Web Summary : अशनूर कौर फिनाले से ठीक पहले 'बिग बॉस 19' से बाहर हो गईं। रिपोर्ट के अनुसार, उन्होंने प्रति सप्ताह ₹6 लाख कमाए, इस तरह 14 हफ्तों में कुल ₹84 लाख कमाए। यह राशि विजेता की पुरस्कार राशि से भी अधिक है। कौर ने पांच साल की उम्र में अभिनय की शुरुआत की।

Web Title : Ashnoor Kaur's 'Bigg Boss 19' Salary Revealed: You'll Be Shocked!

Web Summary : Ashnoor Kaur was evicted from 'Bigg Boss 19' just before the finale. Reportedly, she earned ₹6 lakh per week, totaling ₹84 lakh for her 14-week stay. This amount exceeds the winner's prize money. Kaur debuted in acting at age five.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.